राजस्थानमधील नागौर जिल्हा एक भयानक प्रकरण समोर आला आहे. नागौरमध्ये तीन नराधमांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला, नंतर ते इतक्यावरच थांबले नाही तर त्या महिलेच्या गुप्तांगात बाटली बाटली खुपसली. या घटनेनंतर पीडितेचा खूप रक्तस्त्राव झाला तेव्हा ती वेदनांनी ओरडू लागली. धाडस करून ही पीडित महिला घरी आली आणि घटनेची माहिती तिच्या कुटुंबियांना दिली. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिन्ही आरोपींनी बलात्कारानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. धमक्यांमुळे कुटुंबातील सदस्य भयभीत झाले, परंतु अखेर कुटुंबीयांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. मात्र, आधी पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाला चांगली वागणूक दिली नाही. घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ही घटना परबतसर भागातील गांगवा गावची आहे. दिलेल्या तक्रारीनुसार, महिला 19 जानेवारीला शेजारच्या शेतावर बांधलेल्या घरात ताक घ्यायला गेली होती. पीडित महिलेने सांगितले की, ती ताक घेत असताना जवळील शेतात काम करणारे तीन तरुण तिच्याकडे आले आणि जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. तिन्ही तरुणांच्या तावडीतून सुटण्याचा पुरेपूर प्रयत्न तिने केला, परंतु तोपर्यंत नराधमांनी तिच्या अब्रूचे धिंदवडे काढले होते. सामूहिक बलात्कारानंतर त्या महिलेच्या गुप्तांगात नराधमांनी बाटली खुपसली, अशी लाईव्ह हिंदुस्थानने दिली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्याचे प्रभारी रूपाराम चौधरी यांनी सांगितले की, घटनेची माहिती उप एसपी मकराना सुरेशकुमार समरिया यांना देण्यात आली आहे. अहवालानुसार ही महिला शेजारच्या पाचूराम जाट यांच्या शेतात ताक घेण्यास गेली होती. महिला एकटी सापडल्याने पाचूराम जाट आणि त्याचे साथीदार कानाराम जाट, श्रावण गुर्जर यांनी तिला धमकावून बलात्कार केला. सध्या हे तिन्ही आरोपी खेड्यातून फरार आहेत. त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे घाबरुन राहणाऱ्या कुटुंबातील सदस्याने घटनेची माहिती तत्कालीन प्रभारीला देण्याचे धाडस केले असता पोलीस ठाण्याचे प्रभारी गुन्हा नोंदविला नाही. कारण त्यांची या स्थानकावरून बदली झाली आहे. त्याच वेळी, पोलीस याप्रकरणी हेळसांड करत असल्याचे आढळून आले त्यावेळेस आली, तसेच जुन्या पोलीस स्टेशन प्रभारीची बदली होऊन नव्या स्टेशन प्रभारीनेही कुटूंबाच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदविला नाही.
भयंकर! महिलेवर तीन नराधमांनी केला सामूहिक बलात्कार अन् गुप्तांगात बाटली खुपसली
By पूनम अपराज | Updated: January 28, 2021 16:10 IST
Gangrape : कुटुंबीयांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. मात्र, आधी पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाला चांगली वागणूक दिली नाही.
भयंकर! महिलेवर तीन नराधमांनी केला सामूहिक बलात्कार अन् गुप्तांगात बाटली खुपसली
ठळक मुद्देमहिला 19 जानेवारीला शेजारच्या शेतावर बांधलेल्या घरात ताक घ्यायला गेली होती. पीडित महिलेने सांगितले की, ती ताक घेत असताना जवळील शेतात काम करणारे तीन तरुण तिच्याकडे आले आणि जबरदस्ती करण्यास सुरुवात केली.