शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियन तरुणीवर सपासप वार, वाळूत अर्ध्यापर्यंत पुरलं, भारतात पळून आला; पण अखेर सापडलाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:03 IST

Australia Toyah Cordingley murder case: सात वर्षांपूर्वी घडला होता प्रकार, आज सुनावली शिक्षा

Australia Toyah Cordingley murder case: ऑस्ट्रेलियात सात वर्षांपूर्वी झालेल्या एका हत्येप्रकरणी एका भारतीय व्यक्तीला दोषी ठरवण्यात आले आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियातील वांगेट्टी बीचवर २४ वर्षीय टोया कॉर्डिंग्लेचा मृतदेह वाळूत अर्धा गाडलेला आढळून आला होता. उत्तर क्वीन्सलँडमधील हा समुद्रकिनारा केर्न्स आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या पोर्ट डग्लस यांच्यामध्ये आहे. कॉर्डिंग्लेवर २६ वेळा चाकूने वार करण्यात आले होते आणि तिचा गळाही चिरण्यात आला होता. ४१ वर्षीय राजविंदर सिंग घटनास्थळावरून पळून गेला आणि तो चार वर्षे भारतात लपला होता. २०२२ मध्ये त्याच्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला. महिनाभर चाललेल्या खटल्यानंतर त्याला दोषी ठरवण्यात आले. राजविंदरविरुद्धचा हा दुसरा खटला होता. याआधी मार्चमध्ये खटला चालवण्यात आला होता, पण त्यात ज्युरी निकालापर्यंत पोहोचू शकले नव्हते.

कॉर्डिंग्लेच्या हत्येनंतरचा गोंधळ

कॉर्डिंग्ले ही मेडिकल सेवा देणाऱ्या दुकानातील कर्मचारी आणि प्राणी निवारा स्वयंसेवक होती. तिच्या कामामुळे स्थानिक पातळीवर तिला मोठा प्रतिसाद मिळात होता. तिच्या हत्येमुळे क्वीन्सलँडमध्ये शोककळा पसरली होती. केर्न्स सर्वोच्च न्यायालयाने असे ऐकले की कॉर्डिंग्लेवर वारंवार धारदार वस्तूने वार करण्यात आले आणि नंतर वाळूमध्ये तिला पुरण्यात आले, ज्यामुळे ती जगू शकली नाही.

तपास सुरु होण्याआधीच राजविंदर फरार

मूळचा पंजाबचा रहिवासी असलेला राजविंदर हत्येच्या वेळी इनिसफेल येथे राहत होता. हे शहर गुन्ह्याच्या ठिकाणापासून सुमारे दोन तास दूर आहे. पोलिसांनी ताबडतोब त्याला संशयित म्हणून ओळखले आणि तपास सुरू केला, परंतु तो आधीच देश सोडून पळून गेला होता. त्याची पत्नी, तीन मुले आणि पालक मागे सोडून. चार वर्षांनंतर त्याला दिल्लीत अटक करण्यात आली आणि २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाला प्रत्यार्पण करण्यात आले.

न्यायालयात पुरावे सादर

घटनास्थळावरून फोन रेकॉर्ड, डीएनए नमुने, सीसीटीव्ही आणि ट्रॅफिक कॅमेरा फुटेजदेखील जप्त करण्यात आले. यावरून रविंदरच्या कारची हालचाल दिसून आली. पुराव्यांमध्ये एका काठीवर सापडलेला डीएनए देखील समाविष्ट होता, जो राजविंदरचा होता. तपासात असेही दिसून आले की हल्ल्यानंतर कॉर्डिंग्लेचा फोन आणि राजविंदरच्या कारचे लोकेशन एकमेकांशी मिळतेजुळते आहे. म्हणजेच कॉर्डिंग्लेचा फोन कारमध्ये होता. राजविंदरला मंगळवारी त्याच्या शिक्षेच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Australian woman murdered, buried; Indian man caught after fleeing.

Web Summary : Rajwinder Singh was found guilty of murdering Toyah Cordingley in Australia in 2018. He fled to India but was later arrested and extradited. Evidence included DNA, phone records, and CCTV footage. He will face sentencing soon.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAustraliaआॅस्ट्रेलियाArrestअटकCourtन्यायालय