मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून भाड्याच्या कारची अफरातफर आणि फसवणुकीचे एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. अन्नपूर्णा पोलीस ठाण्याने कार रेंटलच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या संजय कालरा नावाच्या सराईत आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी सुमारे ३ कोटी रुपये किमतीच्या २४ लक्झरी कार जप्त केल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ४० हून अधिक तक्रारदार समोर आले असून, चौकशीत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
अन्नपूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तक्रारदाराने पोलिसांत तक्रार दिली होती की, आरोपी संजय कालराने त्याची कार भाड्याने घेतली होती. सुरुवातीला आरोपीने सुमारे दोन महिने नियमितपणे भाडं दिलं, मात्र त्यानंतर अचानक भाडं देणं बंद केलं. जेव्हा तक्रारदाराने आपली कार परत मागितली, तेव्हा आरोपी टाळाटाळ करू लागला. ही तक्रार दाखल होताच एकामागून एक अनेक पीडित समोर येऊ लागले.
महागड्या गाड्या भाड्याने घ्यायचा
पोलीस तपासात असं निष्पन्न झालं की, आरोपी लोकांकडून महागड्या आणि लक्झरी गाड्या भाड्याने घ्यायचा आणि नंतर त्या वेगवेगळ्या ठिकाणी गहाण ठेवून मोठी रक्कम वसूल करायचा. आरोपीने केवळ इंदूरमध्येच नव्हे, तर आसपासच्या जिल्ह्यांतही अनेक लोकांना आपला सावज बनवलं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने अनेक महागड्या गाड्यांच्या माध्यमातून ही फसवणूक केली.
२४ लक्झरी कार जप्त
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अन्नपूर्णा पोलिसांनी संपूर्ण नेटवर्कची चौकशी सुरू केली आणि आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी विविध ठिकाणांहून २४ लक्झरी कार जप्त केल्या आहेत, ज्यांची एकूण किंमत ३ कोटी रुपयांहून अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे.
४० हून अधिक तक्रारी
या प्रकरणाबाबत माहिती देताना डीसीपी आनंद कलाद यांनी सांगितलं की, "आरोपीविरुद्ध आतापर्यंत ४० हून अधिक तक्रारी मिळाल्या आहेत. पोलिसांची चौकशी अद्याप सुरू असून, यामध्ये आणखी सुमारे १६ कार जप्त करणं बाकी आहे." या फसवणुकीत आरोपीला आणखी कोणी मदत केली होती का आणि गहाण ठेवलेल्या कारमागे कोणतं नेटवर्क काम करत होतं, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या अन्नपूर्णा पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.
Web Summary : Indore police arrested a man for defrauding people via car rentals. He leased luxury cars and pawned them. Police seized 24 cars worth crores and are investigating over 40 complaints, expecting to uncover a larger network.
Web Summary : इंदौर पुलिस ने कार किराए पर लेकर धोखाधड़ी करने वाले एक व्यक्ति को गिरफ्तार किया। वह लग्जरी कारें किराए पर लेता और उन्हें गिरवी रख देता था। पुलिस ने करोड़ों की 24 कारें जब्त कीं और 40 से अधिक शिकायतों की जांच कर रही है, जिससे एक बड़े नेटवर्क का खुलासा होने की उम्मीद है।