शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! माजी नगरसेवकासह मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 16:12 IST

Suicide Attempt : नगर परिषदेची अनधिकृत खोकेधारकांविरोधी कारवाई

ठळक मुद्देही कारवाई रोखण्यासाठी माजी नगरसेवक रमेश खळे व त्यांचा मुलगा साहिल खळे या दोघांनी इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी प्रसंगावधान राखत या दोघांना ताब्यात घेतले.

चिपळूण : दिवाळीची सुट्टी संपताच येथील नगर परिषद अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी बाजारपेठेत खोकेधारकांविरोधात धडक कारवाई केली. मात्र, ही कारवाई रोखण्यासाठी माजी नगरसेवक रमेश खळे व त्यांचा मुलगा साहिल खळे या दोघांनी इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी प्रसंगावधान राखत या दोघांना ताब्यात घेतले.कोरोनाच्या परिस्थितीमुळे नगर परिषदेने बाजारपेठेतील  अनधिकृत खोकेधारक व हातगाडीधारकांविरोधातील मोहीम थांबली होती. मात्र काहींनी त्याचा फायदा उठवत मोठी दुकाने मांडली होती. काहींनी तर कायमस्वरूपी बांधकामे केली होती. याविषयी ऐन दिवाळीत मोठी ओरड सुरु होती. अशातच माजी नगरसेवक खळे यांनी शिवनदी पुलानजिक वडापावच्या हातगाडी सोबत 'प्रेमाची चहा' हा नवीन स्टॉल उभारला होता. सोमवारीच काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नगर परिषदने ही कारवाई सुरु केली.या कारवाईला सुरुवात करताच माजी नगरसेवक खळे हे टपरीच्या शेडवर चढले, तर त्यांचा मुलगा साहिल खडस शॉपिंग मॉल इमारतीवर चढला आणि कारवाई झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला. खळे ज्याठिकाणी उभे होते. तेथून मुख्य विद्युत लाईन गेल्याने त्या लाईनला पकडून आत्महत्या करेन, असा इशारा दिला. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा तत्काळ खंडित करण्यात आला. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. तसेच पोलिसांची मोठी तुकडी तेथे दाखल झाली होती. अखेर पोलिसांनी प्रसंगावधान राखत साहिल खळे याला इमारतीवरून खाली उतरवले व ताब्यात घेतले. त्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून शेडवर उभे असलेले खळे हेही दुपारी २ वाजता शेडवरुन खाली उतरले. त्यानंतर भोगाळे, मध्यवर्ती बस स्थानक व उर्वरित भागात नगर परिषदेची कारवाई सुरुच होती.

टॅग्स :Suicideआत्महत्याRatnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणPoliceपोलिस