शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
3
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
4
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
5
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
6
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
7
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
8
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
9
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
10
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
11
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
12
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
13
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
14
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
15
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
16
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
17
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
18
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
19
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
20
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज

डहाणूत ज्वेलर्सवरील दरोड्याचा प्रयत्न फसला; दुकान मालकावर रोखले रिव्हॉल्व्हर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 09:49 IST

डहाणू येथील सागरनाका रस्त्यावरील चंद्रिका हॉटेलच्या बाजूला असलेल्या पार्श्व ज्वेलर्सच्या दुकानात मंगळवारी दुपारी दोन व्यक्ती आल्या. त्यांनी सोने खरेदीसाठी दुकान मालक प्रज्योत कर्नावट यास सोन्याची अंगठी, चेन, दाखविण्यास सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगर परिषदेजवळच्या एका सोने-चांदीच्या दुकानावर बुधवारी भर दुपारी दोघा अनोळखी रिव्हॉल्व्हरधारी युवकांनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने प्रवेश करून ज्वेलर्स मालकाचा हात पकडून रिव्हॉल्व्हर रोखले. परंतु, दुकान मालक प्रज्योत कर्नावट यांनी प्रसंगावधान राखून झटापट करून आरडाओरड केल्याने रस्त्यावरील लोक धावत येत असल्याचे पाहून दरोडेखोरांनी तिथून पळ काढला.

डहाणू येथील सागरनाका रस्त्यावरील चंद्रिका हॉटेलच्या बाजूला असलेल्या पार्श्व ज्वेलर्सच्या दुकानात मंगळवारी दुपारी दोन व्यक्ती आल्या. त्यांनी सोने खरेदीसाठी दुकान मालक प्रज्योत कर्नावट यास सोन्याची अंगठी, चेन, दाखविण्यास सांगितले. तीन लाखांचे सोने आम्हाला घ्यायचे आहे; परंतु तुमच्याकडे कार्ड स्विफ्ट करण्याचे मशीन आहे काय असे विचारले. तेव्हा दुकानदाराने नाही सांगितल्यावर आम्ही उद्या येतो असे सांगून दोन दरोडेखोर बुधवारी पुन्हा दुकानात आले. त्यांनी दागिने पुन्हा दाखविण्यासाठी सांगितले. यावेळी एका दरोडेखोरांनी दुकान मालक प्रज्योत यांचा हात पकडून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविला. परंतु, झटापट करून हात सोडवून मालकाने आरडाओरड केल्याने दुकानात बॅग टाकून दरोडेखोर मोटारसायकलवरून बाहेर पळून जाण्यात यशस्वी ठरले.  पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :Goldसोनं