शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न; अनिल जयसिंघानीवर आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 12:18 IST

या आरोपपत्रात १३ साक्षीदारांच्या साक्ष जोडल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी केलेल्या तक्रारीनुसार, अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षा कपडे व दागिने डिझायनर आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी असलेला क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी, त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी व चुलत  भाऊ यांच्यावर मुंबई पोलिसांनी ७३३ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. 

या आरोपपत्रात १३ साक्षीदारांच्या साक्ष जोडल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी केलेल्या तक्रारीनुसार, अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षा कपडे व दागिने डिझायनर आहे. व्यवसायानिमित्ताने अनिक्षाने अमृता यांच्याशी जवळीक साधली. त्यानंतर तिने तिच्या वडिलांवरील सर्व प्रकरणे रद्द करण्याची विनंती अमृता यांना केली. त्याबदल्यात अमृता यांना एक कोटी रुपये देऊ केले. या मागणीनंतर अमृता यांनी तिचा नंबर ब्लॉक केला. तरीही त्यांना वेगवेगळे व्हिडीओ, मेसेज जयसिंघानीकडून येत राहिले. गुन्हा दाखल केल्यानंतर दोन दिवसांनी अनिक्षाने अमृता यांना मेसेजद्वारे धमकी देत त्यांचे फोटो व्हायरल न करण्यासाठी दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली. अनिक्षाने पाठवलेल्या एका व्हिडीओत तिच्या हातात एक बॅग आहे. त्यात ती पैसे भरताना दिसते आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तीच बॅग अमृता यांच्या  घरी दिसते. त्यावर एफएसएल रिपोर्टने स्पष्टीकरण देताना म्हटले की, पहिल्या व्हिडीओत बॅग भरलेली आहे, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये बॅग हलकी असल्याचे दिसते. 

‘ती’ची साक्ष ग्राह्यअनिल जयसिंघानी, अनिक्षा जयसिंघानी आणि त्यांचा नातेवाईक निर्मल जयसिंघानी यांची नावे आरोपपत्रात आरोपी म्हणून आहेत. २० फेब्रुवारी रोजी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांना मार्चमध्ये अटक करण्यात आली होती.  आरोपपत्रात सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत दिलेल्या विधानांचा समावेश आहे. तसेच अनिक्षाच्या मैत्रिणीने दंडाधिकारींसमोर दिलेल्या जबाबाचाही समावेश आहे. खटल्यादरम्यान तिची साक्ष ग्राह्य धरण्यात  येईल. 

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस