उल्हासनगरात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; मुलीला लहान बाळ, आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2022 20:29 IST2022-04-26T20:28:56+5:302022-04-26T20:29:04+5:30
मुलीला लहान बाळ असून पोलिसांनी आरोपीवर बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगरात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; मुलीला लहान बाळ, आरोपीला अटक
-सदानंद नाईक
उल्हासनगर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून २ वर्षांपूर्वी पळून नेणाऱ्या तरुणाला हिललाईन पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली. मुलीला लहान बाळ असून पोलिसांनी आरोपीवर बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालगावमध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय मोहम्मद शेख उर्फ अली याने शेजारील १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून २० जून २०२० साली पळून नेले. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान मुलीचा तपास पोलीस करीत होते. मात्र त्यांना निश्चित माहिती मिळत नोव्हती. अखेर अपहरण झालेल्या मुलीची माहिती मिळल्यावर हिललाईन पोलिसांचे पथक थेट पश्चिम बंगाल मधील मुरजिदाबाद येथे जाऊन मुलीसह लग्नाचे आमिष दाखवून पळून आणलेल्या मोहम्मद शेख उर्फ अली याला पोलिसांनी अटक केली.
अल्पवयीन मुलीला लहान बाळ असून पोलिसांनी तीला उल्हासनगरात आणले. पोलिसांनी आरोपी मोहम्मद शेख याच्यावर अपहरण, बलात्कारसह पोक्सो अंतर्गत कारवाई केली. न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडी सुनावली आहे.