शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गिफ्ट डिलिव्हरीच्या बहाण्याने जाेगेश्वरीत डॉक्टरांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न फसला, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 06:43 IST

Crime News :जोगेश्वरी पूर्वेतील सॅटेलाइट पार्क या सहकारी गृहनिर्माण संस्थेत गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ‘गिफ्ट’ देण्याचा बहाणा करत दोघे तोंडाला कपडा बांधून आत शिरले.

मुंबई : कडक निर्बंध असल्याने काेराेनाच्या ‘ब्रेक दि चेन’ला सहकार्य करुन नागरिक जीवनावश्यक वस्तू पार्सल मागवत आहेत. याचाच फायदा घेऊन चाेर डिलिव्हरी बॉयच्या वेशात इमारतीत प्रवेश करून लुबाडणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असाच एक फिल्मी थरार गुरुवारी जोगेश्वरीत घडला. चोरांनी गिफ्ट डिलिव्हरीच्या बहाण्याने सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या डॉक्टरच्या पत्नीला जखमी केले. मात्र शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे त्यांचा जीव वाचला व आरोपीही गजाआड झाले.जोगेश्वरी पूर्वेतील सॅटेलाइट पार्क या सहकारी गृहनिर्माण संस्थेत गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ‘गिफ्ट’ देण्याचा बहाणा करत दोघे तोंडाला कपडा बांधून आत शिरले. नेमके त्याचवेळी इमारतीचा सुरक्षारक्षक तिथे नसल्याने रजिस्टरमध्ये नोंद न करता ते थेट सी विंगमधील सहाव्या मजल्यावरील डॉक्टर राजेशकुमार यादव यांच्या फ्लॅटसमोर उभे राहिले. त्यावेळी घरात फक्त डॉक्टरांची पत्नी सुशीला (४१) होत्या. पार्सल दिल्यावर पावतीवर सही करायला सांगत अचानक या चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. वार चुकवण्यासाठी त्या जमिनीवर बसल्या व जोरजोरात ओरडू लागल्या. या प्रयत्नात त्यांच्या हाताला चाकू लागला व त्या जखमी झाल्या. मात्र त्याचवेळी शेजारी नागेश बुरला बाहेर आले. प्रसंगावधान राखत त्यांनी चाेरट्यांच्या हातातला चाकू हिसकावला आणि आरडाओरडा करून सुरक्षारक्षक, इतर रहिवाशांना गाेळा करण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान दोन चोर घाबरून पार्किंगमधील छोट्या भिंतीवरून उड्या टाकून फाटकाबाहेर पळाले. त्यामागाेमाग तिसराही पळाला. बुरला यांच्यासह अन्य काही जणांनीही चाेरांचा पाठलाग केला. सुरक्षारक्षकाने सुमारे २०० मीटरपर्यंत पाठलाग करून एकाला पकडले. विक्रम यादव (३३) असे पकडलेल्या चाेराचे नाव आहे.

चोराच्या हातातला चाकू हिसकवलामी चोरांच्या अंगावर धावत गेलो. त्यांच्या हातातील चाकू हिसकावला. त्यातील एकाने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र माझ्यावर नियंत्रण मिळवता येणार नाही हे समजल्यावर तो पळाला. अखेर पाठलाग करून एकाला पकडण्यात आले. अन्य दाेघांनाही जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली.- नागेश बुरला, यादव यांचे शेजारी

डिलिव्हरी बॉयच्या वेशात येणाऱ्यांचा सुरक्षारक्षकांना संशय येत नाही. याचाच फायदा घेऊन चाेरट्यांनी ही योजना आखली असावी. त्यामुळे कडक निर्बंधांच्या काळात नागरिकांनी सावध रहावे.- मेघना सामंत, यादव यांचे शेजारी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक