उल्हासनगर : महापालिका सफाई कामगार राजू गांगुर्डे याने बदली केली जात नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गेल्या आठवाड्यातही त्याने असा प्रयत्न केला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई संबंधित स्वच्छता निरीक्षक करणार असल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी दिली.उल्हासनगर महापालिका आरोग्य विभागातील सफाई कामगार राजू गांगुर्डे प्रभाग समिती क्र -३ मधील प्रभाग क्र-६ मध्ये सफाई कामगार आहे. गेल्या काही महिन्या पासून माझी बदली दुसरीकडे करा. असा तगादा त्यांनी आरोग्य विभागाकडे लावला होता. मागणी करूनही दुसरीकडे बदली होत नसल्याच्या निषेधार्थ गेल्या आठवड्यात महापालिका मुख्यालयामध्ये फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही बदली झाली नाही. या नैराश्यातून बुधवारी पुन्हा एकदा गांगुर्डे यांनी महापालिका मुख्यालयात फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने महापालिकेत एकच गोंधळ उडून महापालिका कामकाजावर कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप थोरात यांनी टीका केली. बदलीच्या कारणावरून एक सफाई कामगार एक नव्हेतर दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न का करतो? याबाबत आयएएस दर्जाच्या आयुक्तांनी दखल घ्यावी. असे थोरात यांचे म्हणणे आहे.महापालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी सफाई कामगार राजू गांगुर्डे कामाला सतत दांड्या मारतो. तसेच दारू पिऊन कामाला येतो. अश्या तक्रारी संबंधित अधिकारी यांच्या आहेत. अशी प्रतिक्रिया केणी यांनी दिली. कामाला दांडी मारू नको व दारू पिऊन कामाला येऊ नको. असे बजावूनही सफाई कामगार राजू गांगुर्डे यांच्या वागण्यात बदल झाले नाही. तसेच बदलीचे आश्वासन गेल्या आठवड्यात दिली होते. असे केणी यांचे म्हणणे आहे. एकूणच महापालिका आरोग्य विभागासह अन्य विभागात गोंधळ उडाल्याचे चित्र आहे.
उल्हासनगर महापालिका सफाई कामगाराचा फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 22:15 IST
Suicide Attempt : बदलीच्या कारणावरून एक सफाई कामगार एक नव्हेतर दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न का करतो? याबाबत आयएएस दर्जाच्या आयुक्तांनी दखल घ्यावी. असे थोरात यांचे म्हणणे आहे.
उल्हासनगर महापालिका सफाई कामगाराचा फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न
ठळक मुद्देमहापालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी सफाई कामगार राजू गांगुर्डे कामाला सतत दांड्या मारतो. तसेच दारू पिऊन कामाला येतो. अश्या तक्रारी संबंधित अधिकारी यांच्या आहेत. अशी प्रतिक्रिया केणी यांनी दिली.