शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हल्लेखाेर म्हणाले, ठाकरेंना नडतोस का? मनसे नेते संदीप देशपांडेंवर ‘मॉर्निंग वॉक’वेळी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 06:42 IST

शिवाजी पार्क येथील घटना; मास्क लावून आलेल्यांनी केली स्टम्प, बॅटने मारहाण 

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मॉर्निंग वॉक करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मास्क लावून आलेल्या तिघांनी स्टम्प व बॅटने हल्ला केल्याची घटना शिवाजी पार्क येथे शुक्रवारी घडली. शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी आठ पथके तैनात करत तपास सुरू केला आहे. 

देशपांडे हे नियमितपणे शिवाजी पार्क येथे मित्रांसोबत मॉर्निंग वॉकला येतात. वॉक झाल्यानंतर सगळे एकत्रित नाक्यावर भेटतात. शुक्रवारी सकाळी देशपांडे नेहमीप्रमाणे वॉक करत असताना मास्क लावून आलेल्या त्रिकुटाने त्यांच्यावर हल्ला केला. स्टम्प आणि बॅटने त्यांना मारहाण करत हल्लेखोर पळून गेले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

हल्लेखाेर म्हणाले, ठाकरेंना नडतोस का?   संदीप देशपांडे यांनी जबाबात म्हटले आहे की, सकाळी नेहमीप्रमाणे ६.५० च्या सुमारास माहीम येथील घरातून मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्क मैदानाकडे निघालो. मैदानाचे गेट क्रमांक ५ येथे सातच्या सुमारास पोहोचलो.  मात्र, अन्य मित्र आले नव्हते. म्हणून एकट्यानेच वॉक सुरू केले. मैदानाचा एक राऊंड पूर्ण करून सी. रामचंद्र चौकाकडून मैदानाच्या गेट ५ कडून पुढे येताच, कुणीतरी मागून उजव्या पायाच्या मांडीवर फटका मारला म्हणून मागे वळून पाहताच चार तरुण दिसले. त्यांच्या हातात लाकडी स्टंप व बॅट होते.  शिव्या घालून पत्र लिहितोस का? ठाकरेंना नडतोस का? वरुणला नडतोस का?, असे विचारत मारहाण केली. स्थानिकांनी मध्यस्थी केली. त्यांनाही ओरडून धमकाविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची पळापळ झाली. 

उजव्या हाताला फ्रॅक्चर  स्थानिकांच्या मदतीने देशपांडे यांना तत्काळ हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. देशपांडे यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे, तर डाव्या पायाला दुखापत झाली आहे.  घटनेची माहिती मिळताच शिवाजी पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. देशपांडे यांना डिस्चार्ज दिल्यानंतर ते माहीम  येथील घरी आले. शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कसबे यांनी घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवून घेतला.  त्यानुसार, तिघांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी आठ पथके तयार केली आहेत. 

टॅग्स :Sandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसे