शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरला मारहाण करुन दवाखान्यात तोडफोड; मुलासह नातलगावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 20:43 IST

उपचारासाठी येण्यास नकार व वडिलांचे मृत्यु प्रमाणपत्र न दिल्याने डॉक्टरला मारहाण

ठळक मुद्देडॉ. डाहुलेंच्या फिर्यादी वरुन योगेश व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच डॉक्टरला मारहाण केल्याची घटना मीरारोड पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.

 

मीरारोड - वडिलांची स्थिती गंभीर असताना उपचारास येण्यास तसेच वडिलांच्या मृत्युनंतर दाखला देण्यास नकार दिल्याचा राग धरुन मुलाने त्या डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन तोडफोड केली. तसेच डॉक्टरला मारहाण केल्याची घटना मीरारोड पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे.मीरारोडच्या वाघड नगर, लिबर्टी कॉर्नर येथे डॉ. निलेश डाहुले (३७) यांचा श्री बालाजी नावाने दवाखाना आहे. योगेश मिश्रा व कुटुंबियांचे डॉ. डाहुले हे सुमारे ८ वर्षांपासून कौटुंबिक डॉक्टर आहेत. योगेश यांचे वडिल शिवशंकर हे ८० वर्षांचे असून त्यांच्यावर डॉ. डाहुले हेच उपचार करत होते. २ सप्टेंबर रोजी योगेश यांनी डॉ. डाहुले यांना फोन करुन वडिलांची प्रकृती ठिक नसल्याचे सांगितले. त्यावर डॉ. डाहुले यांनी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिल्ला.काही वेळाने योगेशने पुन्हा फोन करुन रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका येईपर्यंत एकदा तपासून बघा अशी विनवणी केली असता डॉ. डाहुले यांनी आपल्या मुलास ताप असल्याचे सांगून असमर्थता व्यक्त केली. परंतु, सकाळी डॉ. डाहुलेंना शिवशंकर यांचे निधन झाल्याचे समजले. योगेशने मृत्यु प्रमाणपत्र देण्याची विनंती केली होती. परंतु, मंगळवारी रात्री योगेश हा एका परिचीतासोबत डॉ. डाहुले यांच्या दवाखान्यात गेला व तेथे त्याने डॉ. डाहुलेंना मोठठ्या आवाजात दरडावर मारहाण केली. त्यांच्या टेबलावरील सामान फेकून देत केबीनची काच फोडली. या प्रकरणी डॉक्टरांच्या संघटनेने बुधवारी मीरारोड पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकारायांची भेट घेतली व कारवाईची मागणी केली. तर डॉ. डाहुलेंच्या फिर्यादीवरुन योगेश व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :doctorडॉक्टरmira roadमीरा रोडArrestअटकPoliceपोलिस