शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षावर हल्ला; मास्कधारी अज्ञातांकडून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 20:17 IST

आज सायंकाळी जेएनयू शिक्षक संघटनेने विद्यार्थी संघटनांची बैठक बोलावली होती.

ठळक मुद्दे या हल्ल्यात जखमी झालेल्या घोषचा चेहरा रक्तबंबाळ झाला असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. डाव्यांनी या हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (ABVP) हात असल्याचा संशय वर्तविला आहे. 

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आयशे घोष यांना जेएनयू परिसरात बेदम मारहाण करण्यात आली आहे. घोष याने दिलेल्या माहितीनुसार, मास्कधारी अज्ञातांनी घोषवर हल्ला केला. तसेच मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात जखमी झालेल्या घोषचा चेहरा रक्तबंबाळ झाला असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. डाव्यांनी या हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (ABVP) हात असल्याचा संशय वर्तविला आहे. 

आज सायंकाळी जेएनयू शिक्षक संघटनेने विद्यार्थी संघटनांची बैठक बोलावली होती. त्यावेळी जेएनयू विद्यार्थी संघटना आणि ABVP या दोन विद्यार्थी संघटनेत तुंबळ हाणामारी झाली. दरम्यान, एक शिक्षक देखील या हाणामारीत जखमी झाल्याचे व्हिडिओत दिसून आले आहे. 

जेएनयूने पुकारले होते आंदोलन गेल्या काही दिवसांपासून हॉस्टेलच्या नियमात बदल यासोबतच फी वाढ, विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयांना टाळे लावल्याविरोधात विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत होते. तसेच विद्यार्थ्यांना ड्रेस कोडचे देखील निर्बंध लादल्याने विद्यार्थ्यांकडून विरोध करण्यात येत होता. यानंतर विद्यापीठ प्रशासनानं शुल्कवाढीचा निर्णय मागे घेतला. शिक्षण सचिव आर. सुब्रमण्यन यांनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली होती. जेएनयूच्या प्रशासकीय समितीनं वसतिगृहाच्या शुल्कवाढीचा निर्णय मागे घेतल्याचं सुब्रमण्यन यांनी म्हटले होते. विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करुन पुन्हा वर्गांमध्ये जावं, असं आवाहन त्यांनी केलं होतं. तसेच केंद्र सरकारने तीन सदस्यीय समिती स्थापन करुन फी दरवाढीवर उपाय योजण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, फी दरवाढीचा मागे घेण्यासाठी जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला होता. हा वाद चिघळला असून पोलिसांनी काही विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी एम्समध्ये भरती केलेल्या 18 विद्यार्थ्यांची भेट घेऊन विचारपूस केली. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मारहाणीच्या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनीही विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला आहे. जेएनयूच्या आवाराला पोलिसांनी वेढा घातला असून काही आरोपींची ओळखही पटविली आहे.

टॅग्स :jnu attackजेएनयूStudentविद्यार्थीNew Delhiनवी दिल्ली