शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

School Bus Attack: स्कूल बसवर तलवारींनी हल्ला, भर रस्त्यात थरार; जखमी ड्रायव्हरनं असा वाचवला विद्यार्थ्यांचा जीव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 12:04 IST

पंजाबच्या बरनालामध्ये स्कूल बसवर धारधार शस्त्रधारी बाइकस्वारांनी हल्ला चढवला. यात बस ड्रायव्हर जखमी झाला. धारधार शस्त्र आणि तलवारींनी हल्लेखोरांनी बसच्या काचा फोडल्या.

बरनाला-

पंजाबच्या बरनालामध्ये स्कूल बसवर धारधार शस्त्रधारी बाइकस्वारांनी हल्ला चढवला. यात बस ड्रायव्हर जखमी झाला. धारधार शस्त्र आणि तलवारींनी हल्लेखोरांनी बसच्या काचा फोडल्या. बसमध्ये शालेय विद्यार्थी प्रवास करत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि आरडाओरडा सुरू झाला. जखमी झालेल्या ड्रायव्हरनं प्रसंगावधान दाखवत हल्लेखोऱ्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी बस थेट नजिकच्या डीएसपी ठाण्यात नेली. यामुळे बसमधील विद्यार्थ्यांचा जीव वाचला आणि त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. एका हल्लेखोराची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. 

स्कूल बसवर धारधार तलवारींनी केला हल्लाबरनालाच्या एअर फोर्सच्या केंद्रीय विद्या मंदिरच्या शालेय विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसवर काही हल्लेखोरांनी धारधार शस्त्रांनी हल्ला केला. बसमध्ये जवळपास ३० ते ३५ विद्यार्थी होते. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्याचं काम बस ड्रायव्हर करत होता. इतक्यात अचानक चार मोटरसायकलस्वारांनी बसवर हल्ला केला. बसवर चक्क तलवारी आणि लोखंडी हत्यारांनी हल्ला केला. यात बसच्या काचा फुटल्या. तर ड्रायव्हर लखविंदर सिंग तलवारीच्या हल्ल्यात जखमी झाला. तरी प्रसंगावधान बाळगत ड्रायव्हरनं बसचा वेग वाढवत ती थेट पोलीस ठाण्यात नेली आणि हल्लेखोरांपासून सुटका केली. 

बसवरील हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या काहींनी सांगितलं की बसवर ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा खूप दहशतीचं वातावरण होतं. शहरात दिवसाढवळ्या अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे संपूर्ण शहरात दहशतीचं वातावरण आहे. पोलीस प्रशासन आणि सरकारनं अशा पद्धतीचे हल्ले रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली पाहिजेत, असं आवाहन नागरिकांनी केलं आहे. एका स्कूल बसवर अशापद्धतीचा जीवघेणा हल्ला होणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे. 

ड्रायव्हरनं सांगितली आपबितीएका किरकोळ गोष्टीवरुन काही दिवसांपूर्वी ड्रायव्हर लखविंदर सिंग याचं काही जणांसोबत भांडण झालं होतं. त्याच लोकांनी आज बसवर हल्ला केला. त्यांनी मला खाली उतरण्यास सांगितलं आणि बसवरच हल्ला केला, असं ड्रायव्हरनं सांगितलं.

टॅग्स :SchoolशाळाCrime Newsगुन्हेगारीPunjabपंजाब