शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

साईड न दिल्याच्या रागातून दवाखान्यात जाणाऱ्या कुटुंबियावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 21:31 IST

Crime News : मोहाडी रस्त्यावरील घटना : दगडफेकीमुळे तणाव बस वाहकासह दोघे अटकेत

ठळक मुद्देहेमंत संतोष चौधरी व त्याचा भाऊ जगदीश (रा.आदर्श नगर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हेमंत हा एस.टी.महामंडळात वाहक आहे.

जळगाव :  नाशिक येथे कारने दवाखान्यात जात असलेल्या कुटुंबियांवर साईड न दिल्याच्या रागातून मोहाडी रस्त्यावर अडवून लोखंडी रॉड व दगडांचा मारा करुन गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजता घडली. यात सुरेश प्रतापराव साळुंखे, त्यांचे भाऊ अरुण साळुंखे, लताबाई साळुंखे व उर्मिला साळुंखे (सर्व रा.विठ्ठल पेठ) हे चार जण जखमी झाले आहेत. दगडफेकीमुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, हेमंत संतोष चौधरी व त्याचा भाऊ जगदीश (रा.आदर्श नगर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हेमंत हा एस.टी.महामंडळात वाहक आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सुरेश प्रतापराव साळुंखे यांना कमरेचा त्रास असल्याने नाशिक येथे शस्त्रक्रीयेची १ मार्चची तारीख मिळाली आहे. त्यासाठी मुलगा योगेश सुरेश साळुंखे, त्याचे काका अरुण साळुंखे, आई लताबाई, काकु उर्मिला साळुंखे, वैशाली साळुंखे असे शनिवारी कारने (क्र.एम.एच १९ एच.के ३३९५) नाशिक जाण्यासाठी दुपारी निघाले. दुपारी १.४० वाजेच्या सुमारास मोहाडी रस्त्याजवळ आल्यावर मागून दुचाकीवर दोन जण आले आणि कारसमोर आडवे झाले. कार चालक अरुण साळुंखे यांना इच्छादेवी चौकापासून आम्हाला साईड का दिली नाही? म्हणून जाब विचारुन शिवीगाळ केली.

 समजाविण्याचा प्रयत्न केला अन‌् हल्ला कारमधील सर्वांनी दुचाकीस्वारांना समजविण्याचा प्रयत्न केला असता एकाने सुरेश साळुंखे आणि अरूण साळुंखे या दोन्ही भावांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच लताबाई यांच्या हाताचे बोटास दुखापत केली. हेमंत चौधरी याने दगडांचा मारा सुरु केला, त्यात सुरेश साळुंखे यांच्या डोक्याला दगड लागून प्रचंड रक्तस्त्राव झाला. यावेळी दगडफेकीमुळे तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, नितीन पाटील, सचिन मुंडे, गोविंदा पाटील, किशोर बडगुजर यांनी घटनास्थळी धाव घेतली, तोपर्यंत जखमी रुग्णालयात गेले होते तर हेमंत व जगदीश या दोघांना घरातून ताब्यात घेतले. सायंकाळी योगेश साळुंखे यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला

टॅग्स :PoliceपोलिसJalgaonजळगावhospitalहॉस्पिटल