शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘त्या’ दहशतवाद्यांचा ताबा घेणार एटीएस; नांदेड, मनमाड, नवी मुंबईत सुरक्षा यंत्रणांची विशेष नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 10:38 IST

नांदेड आणि आदिलाबादमध्ये मोठा घातपात करण्याचा कट असल्याचे  पोलीस तपासात उघड झाले आहे. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदाच्या ४ हस्तकांना कर्नालमधून अटक करण्यात आली होती. रिंदा हा पाकिस्तानातून भारताविरोधात दहशतवादी कट रचत असल्याचा धक्कादायक खुलासा तपासातून झाला होता. याबाबतच्या अधिक तपासासाठी राज्य दहशतवाद विरोधी पथक या चार  हस्तकांचा ताबा घेणार आहे, तसेच महाराष्ट्रातील नांदेड, मनमाड आणि नवी मुंबईसारख्या भागांवर सुरक्षा यंत्रणांची विशेष नजर आहे.

खलिस्तानी दहशतवादी रिंदानेच तेलंगणामध्ये स्लीपर सेलच्या मदतीने आरडीएक्स पाठविले असल्याची  धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली होती.  हे आरडीएक्स नांदेडमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती सुरुवातीला होती, पण पुढे हे आरडीएक्स तेलंगणामध्ये पाठविण्यात आले होते. हरयाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील बस्तारा जिल्ह्यातून बीएसएफच्या जवानांनी मंगळवारी ४ दहशतवाद्यांना अटक केली.

गुरुप्रीत, अमनदीप, परमिंदर आणि भूपिंदर अशी त्यांची नावे असून,  चौघांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. नांदेड आणि आदिलाबादमध्ये मोठा घातपात करण्याचा कट असल्याचे  पोलीस तपासात उघड झाले आहे. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या अटकेनंतर महाराष्ट्र पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.  या चार अतिरेक्यांचा म्होरक्या हरविंदर सिंह रिंदा याच्या नांदेडमधील साथीदारांच्या घरी धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. पुढील तपासासाठी महाराष्ट्र एटीएस अटकेत असलेल्या दहशतवाद्यांना ताब्यात घेणार आहे. 

 स्लीपर सेलच्या मदतीने लोकांचे ध्रुवीकरण या तिन्ही भागांत खलिस्तानी दहशतवादी स्लीपर सेलच्या मदतीने लोकांचे ध्रुवीकरण करत असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  नांदेडपासून पंजाबपर्यंत अशी अनेक क्षेत्रे आहेत, जिथे स्लीपर सेल तरुणांना खलिस्तानी अजेंड्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. याबरोबरच मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबई परिसरात राहणाऱ्या एका तरुणावरही यंत्रणांची नजर असल्याची माहिती समजते आहे. हा तरुण ख्रिश्चन कुटुंबातील असून, तो शीख धर्माचा प्रचार करत आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान या तरुणाने नवी मुंबईतील अनेकांना आपल्यासोबत दिल्लीला नेले होते, असाही आरोप आहे. याबाबतही एटीएसकडून अधिक  तपास सुरू आहे.a

टॅग्स :terroristदहशतवादी