शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शितपेयात गुंगीचे औषध टाकून विवाहितेवर बॅंकेतच अत्याचार, बॅंक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 23:52 IST

Crime News : पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सप्टेंबर २०१७ मध्ये पंतप्रधान कर्ज योजनेची माहिती घेण्यासाठी ही महिला मैत्रीणीसह शिव कॉलनीतील स्टेट बँकेच्या शाखेत गेली.

जळगाव : कर्जासंदर्भात माहिती घेण्यासाठी आलेल्या ३८ वर्षीय  महिलेवर बॅंक व्यवस्थापकाने सुटीच्या दिवशी बँकेतच अत्याचार केला. त्याशिवाय महिलेचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ व्हारयल करण्याची धमकी देत पतीपासून घटस्फोट घ्यायला भाग पाडून तीन वर्षे अत्याचार  केल्याप्रकरणी स्टेट बँकेच्या शिव कॉलनी शाखेतील व्यवस्थापक अशोक सिताराम शर्मा (रा. मुंबई) याच्याविरुद्ध कर्जासंदर्भात माहिती घेण्यासाठी सोमवारी रात्री याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अत्याचार व अॅक्ट्रासीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सप्टेंबर २०१७ मध्ये पंतप्रधान कर्ज योजनेची माहिती घेण्यासाठी ही महिला मैत्रीणीसह शिव कॉलनीतील स्टेट बँकेच्या शाखेत गेली. यावेळी तेथे व्यवस्थापक शर्मा याने त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला. यानंतर १५ दिवसांनी महिलेस सुटीच्या दिवशी बँकेत बोलावले. बँकेत कोणीही नसल्याची संधी साधत शर्मा याने महिलेस शितपेय पिण्यास दिले. पिल्यानंतर महिलेस गुंगी आली होती. यांनतर त्याने बँकेतच त्यांच्यावर अत्याचार केला. आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ तयार केले. महिला शुद्धीवर आल्यानंतर  महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार करण्याची धमकी देताच त्याने देखील फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर संबधित महिलेस वेळोवेळी फोन करुन त्रास देणे सुरूच ठेवले. महिला नाशिक येथे गेलेली असताना फोटो, व्हिडीओ देण्याच्या बहाण्याने शर्मा देखील तेथे गेला. नाशिकमधील एका लॉजमध्येही आठ वेळा अत्याचार केलेे. 

घटस्फोट घ्यायला भाग पाडलेहा प्रकार वाढत चालल्यामुळे महिलेने त्याच्याविरुद्ध तक्रार देण्याचा प्रयत्न केला.परंतु, यानंतर शर्मा याने तिला लग्नाचे आमीष दिले. त्यासाठी महिलेस घटस्फोट घेण्यास भाग पाडले. शर्माच्या सांगण्यावरुन महिलेने घटस्फोटही घेतला. पण शर्मा याने लग्न केले नाही. याउलट महिलेच्या पतीस पत्र पाठवून तीची बदनामी केली. महिलेस जीवेठार मारण्याची धमकी दिली. जातीवाचक शिवीगाळ करुन तीला अपमानीत केले. अखेर या पिडीत महिलेने सोमवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा तपास करीत आहेत

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी