शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा प्राणघातक हल्ला; बचावासाठी पोलिसाचा गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 21:14 IST

Firing Case : ताब्यात घेताना झाली झटापट : जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती

लातूर : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकावर बुधवारी मध्यरात्री लातूर शहरातील श्रीनगर परिसरात प्राणघातक हल्ला केला. दरम्यान, बचावासाठी पोलीस निरीक्षकाने आरोपीच्या दिशेने गोळीबार करून त्याला ताब्यात घेतले आहे. या झटापटीत पोलीस निरीक्षक जखमी झाले असून, आरोपीला गोळी लागली आहे. दोघांवरही शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले, चाकूर पोलीस ठाण्यामध्ये तसेच अहमदपूर पोलीस ठाण्यात नारायण तुकाराम इरबतनवाड याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. चाकूर पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्यात तो प्रमुख आरोपी आहे. या खुनाच्या चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले होते. त्यावेळी पोलिसाच्या ताब्यातून नारायण इरबतनवाड फरार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर होते. लातूर शहरातील श्रीनगर येथे तो आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांनी त्याच्या अटकेसाठी सापळा रचला.

तेथून निघून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला पकडले. यावेळी त्याने पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. गुप्तांगावर लाथ मारली. यात मोहिते यांना मुका मार लागला आहे. दरम्यान, बचावासाठी मोहिते यांनी पिस्टल काढून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी स्वसंरक्षणासाठी पिस्टलने फायर केली. यात त्याच्या कमरेखाली गोळी लागली आहे. यावेळी चाकूर व एमआयडीसीचे पोलीस तेथे आले. त्यांनी पोलीस निरीक्षक मोहिते व आरोपी नारायण इरबतनवाड यांना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मोहिते यांना रुग्णालयातून सुटी मिळाली असून, आरोपी इरबतनवाड याच्यावर उपचार सुरू असल्याचेही जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले.मादक द्रव्याची विक्री करायचा...जमिनीच्या वादात चाकूर व अहमदपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असलेला आरोपी नारायण इरबतनवाड हा मादक द्रव्याची विक्री करीत होता. त्याला यापूर्वी मिरज परिसरातील एका ढाब्यावरून ताब्यात घेताना पसार झाला होता. पोलीस त्याच्या अटकेसाठी चार महिन्यापासून परिश्रम करीत होते. त्याच्यावर अन्य ठिकाणी गुन्हे दाखल असण्याची शक्यता आहे. अन्य सात राज्यांमध्ये त्याचे नेटवर्क असल्याची माहिती आहे. याअनुषंगाने आता तपास होईल, असेही जिल्हा पोलीस अधीक्षक पिंगळे म्हणाले.

 

टॅग्स :FiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारीlaturलातूरPoliceपोलिस