शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या घटनेवर लोकांचा संताप! भररस्त्यात गदारोळ, वाहनांची जाळपोळ; गर्दीवर पोलिसांचा गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 18:32 IST

Crime News : अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पीडितेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता आसाममध्ये घडली आहे. आसामच्या कछार जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पीडितेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी स्थानिकांनी आपला संताप व्यक्त केला. मोठ्या संख्येने रस्त्यावर गर्दी केली. तसेच त्यांनी निदर्शने करत परिसरात जाळपोळ केली. वाहनांना आग लावली. 

मिळालेल्या माहितीनुसार, कछर जिल्ह्यातील सिलचर येथील आश्रम रोड परिसरात वास्तव्यास असलेली एक अल्पवयीन मुलगी रविवारपासून बेपत्ता होती. तिचा शोध सुरू होता. अखेर बुधवारी पीडितेचा मृतदेह सिलचरच्या मधुरा घाट येथे आढळला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पीडितेच्या या अवस्थेमागे रोनी दास नावाच्या व्यक्तीचा हात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला. रोनी दास यानेच पीडितेचं अपहरण करुन बलात्कार आणि हत्या केली, असा आरोप स्थानिक लोकांनी केला.

रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी जाळून टाकल्या

पीडितेचा मृतदेह सापडल्यानंतर लोकांना संताप अनावर झाला होता. त्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रचंड गर्दी जमली. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. गर्दीतील काहींनी घोषणाबाजी करताना रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी जाळून टाकल्या. गाड्यांना आग लावली. तसेच त्यांनी सुरक्षाकर्मींवर दगडफेक केली. आरोपी रोनी दासच्या नातेवाईकांच्या दुकानांना आग लावण्यात आली. अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. अखेर या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार सुरू केला.

गर्दीतील अनेक लोक दारुच्या नशेत होते

पोलिसांनी हवेत गोळीबार करण्याआधी आंदोलनकर्त्यांना विनंती केली होती. आरोपींना अटक करण्यात आल्याचं सांगितलं होतं. पण आंदोलक तरीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी अनेकांनी दुकानं लुटून हात साफ करुन घेतला. गर्दीतील अनेक लोक दारुच्या नशेत होते. दरम्यान, पीडितेच्या वडिलांनी या गदारोळाचं समर्थन केलेलं नाही. संबंधित भूमिका ही आपली भूमिका नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी 147 सीआरपीएफ जवान, फायर ब्रिगेडच्या गाड्या तैनात करण्यात आल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :AssamआसामCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस