शहरं
Join us  
Trending Stories
1
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
2
Stock Market Bull Run: तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?
3
नाराजीचा भूकंप! एकनाथ शिंदे वगळता शिंदेसेनेचे एकही मंत्री कॅबिनेट बैठकीला हजर नाहीत, कारण...
4
'हिंदुत्वा'वरून प्रकाश महाजन यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात; "राजकारणात भूमिका बदलल्या पाहिजेत, पण.."
5
"...तर मी कोणताही प्रश्न न विचारता राजकारणातून निवृत्ती होईन"; प्रशांत किशोरांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली
6
Video: शिव ठाकरेच्या मुंबईतील फ्लॅटला आग! अख्खं घर जळून खाक, अभिनेता थोडक्यात बचावला
7
समजा अचानक समोर बिबट्या आलाच तर काय कराल? अशी घ्या खबरदारी
8
आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
9
IND vs SA: गौतम गंभीर- शुममन गिल यांच्यात खेळपट्टीवरून मतभेद? मोठ्या पराभवानंतर चर्चांना उधाण!
10
बंगळूर मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी; ई-मेलमध्ये लिहिलेले कारण ऐकून अधिकारीही चक्रावले!
11
Armaan Malik : Video -"आधी तुझ्या मुलांना गोळ्या घालू, मग तुला..."; करोडपती युट्यूबरला जीवे मारण्याची धमकी
12
तिच्या नखरेल अंदाजावरील गंभीरची कमेंट सगळ्यांना खटकली; पण गावसकरांना मात्र पटली! म्हणाले…
13
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
14
Supreme Court: सीबीआयचे तपास अधिकारी बोगस आहेत; सेवेत राहण्यायोग्यच नाहीत: सुप्रीम कोर्ट 
15
८व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का? DA ते TA पर्यंत, पाहा काय मिळणार फायदा
16
Mumbai: ‘माहे’श्रेणीतील पहिले पाणबुडीरोधक स्वदेशी जहाज येत्या सोमवारी नौदलात!
17
Bihar: शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी, पाटण्यातील गांधी मैदानात रोषणाई, थेट बंगळुरूहून मागवली फुले
18
CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले
19
हायव्होल्टेज ड्रामा! "हा माझ्या मामाचा मुलगा, ८ वर्षांपासून प्रेम..."; लग्नात नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री
20
बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्याच्या कानाचा चावा घेऊन तरुणाने विहिरीत मारली उडी, पकडल्यावर म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 22:21 IST

youth ate asi ear tribal jumped in well : या दरम्यान आदिवासी युवकाने दाताने कान चावून तोडला आणि विहिरीत उडी मारली.

ठळक मुद्देजखमी एसआयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अटक आरोपीने सांगितले की, भूताने त्याला कच्चे मास खाण्यास भाग पाडले आहे.

सिंगरौली - मध्य प्रदेश येथे असलेल्या सिंगरौली जिल्ह्यातून एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. सिंगरौलीत अंधश्रद्धेमुळे आदिवासी तरूणाने एएसआयचा कान चावला आहे. तरुण म्हणाला की, भूताने कच्चे मास खाण्यास सांगितले होते, म्हणून त्याने तसे केले. वास्तविक परस्पर जुन्या भांडणाची माहिती मिळताच एएसआय इंद्रराज मिश्रा घटनास्थळी पोहोचले. या दरम्यान आदिवासी युवकाने दाताने कान चावून तोडला आणि विहिरीत उडी मारली.जखमी एसआयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अटक आरोपीने सांगितले की, भूताने त्याला कच्चे मास खाण्यास भाग पाडले आहे, त्यामुळे एएसआयचे कान कापून खाल्ला. संपूर्ण प्रकरण सिंगरौली जिल्ह्यातील आदिवासीबहुल सराय पोलिस स्टेशन परिसरातील टिंगुडी चौकीचा आहे. दारूच्या नशेत काही आदिवासी ग्रामस्थांमध्ये भांडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच एएसआय इंद्रराज मिश्रा आपल्या पोलिस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी रवाना झाले.

घटनास्थळी भेट दिल्यानंतर आदिवासी भांडत होते. बर्‍याच लोकांना समजूत घालून शांत केले गेले. या दरम्यान आरोपी देवधरम सिंह देव दारूच्या नशेत रस्त्यावर पडला होता. एएसआय त्याच्या जवळ येताच आरोपीने एएसआय इंद्रराज मिश्राचा कान दातांनी कापून विहिरीत उडी मारली.पोलिसांनी माणुसकी दाखवत आरोपीला विहिरीतून बाहेर काढले आणि सराय येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्याचवेळी प्रकृती गंभीर झाल्यानंतर एएसआयला रेवा मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले, तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी आरोपीने भूताच्या सांगण्यावरून मी कच्चे मास खाल्ल्याचे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशArrestअटक