शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

अश्विनी बिंद्रे हत्याकांड;सायबर तज्ञ रोशन बंगेरा यांची साक्ष पुर्ण 

By वैभव गायकर | Updated: August 5, 2022 22:26 IST

Ashwini Bindre murder case : हत्येच्या दिवशीचे मयत व आरोपीचा टाईम लाईन नकाशा कोर्टासमोर सादर 

वैभव गायकर 

पनवेल :अश्विनी बिंद्रे हत्याकांडाची सुनावणी शेवटच्या टप्प्यात आहे.पनवेल सत्र न्यायालयात न्यायमुर्ती  के. जी पढेलवार याच्या कोर्टासमोर शुक्रवार दि.5 रोजी सुनावणी दरम्यान या खटल्यात महत्वाचे साक्षीदार असलेले सायबर तज्ञ रोशन बंगेरा यांची साक्ष पुर्ण झाली. हत्येच्या दिवशी मयत अश्विनी बिन्द्रे आणि आरोपी अभय कुरुंदकर यांचा एकत्र असलेला टाईम लाईनचा नकाशा न्यायालयासमोर सादर करण्यात आला.8 जुलै रोजी बंगेरा यांच्या साक्षीला सुरुवात झाली होती.       

सायबर तज्ञ बंगेरा यानी एपीआय अश्विनी बिंद्रे याचे मोबाईल आणि मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याचे मोबाईल यावरून आणि फेसबुक व्हाट्ऑप , लॅपटॉप तसेच सर्व सोशल ॲपमधून महत्वाचा  डाटा रिकव्हर केला होता.आज मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरच्या आरती कुरुंदकर@जीमेल डॉट कॉम'या मेल आयडी ओपन करून गुगल ड्राईव्ह मधील व्हाट्ऑप नंबर नवीन मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घेतले आणि त्यावरील व्हाट्ऑप चॅटच्या प्रिटाआऊट काढल्यानंतर त्यावर सह्या केल्या होत्या त्या आज कोर्टात दाखविण्यात आल्या त्या ओळखल्या.यामध्ये प्रामुख्याने कुरुंदकर YOU साठी Y वापरत होता.याचं मेल आयडी वरून गुगल टाईमलाईन पाहिल्यावर बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याचे मयत एपीआय अश्विनी बिंद्रे ची हत्या झालेल्या दिवशी भाईंदर येथील घरापासून रात्री 1 वाजल्यापासून गाडीने हॉटेल फाऊंटन ते वासूनवघर पर्यंत गाडीने आणि पुन्हा हॉटेल फाऊंटन पासून वासूनवघर पर्यंत चालत रात्री 2.22 पासून 46 मिनिटे चालत दोन वेळा फिरत होता. याच टाईमलाईन नकाशाची प्रिटाआऊट काढली होती ती कोर्टात दाखविली आणि हत्येच्या दुसर्‍या रात्री 12.22 पासून 1.12  पर्यंत चालत कुरुंदकर आणि इतर आरोपी वसई खाडीवरील  तो नकाशा सुध्दा  आज कोर्टासमोर दाखविल्यावर तो ही मान्य केला. हे दोन्ही दिवसाचे नकाशे सायबर एक्सपर्ट रोशन बंगेरा यानी ओळखले.मयत एपीआय अश्विनी बिंद्रे यांच्या  ईमेल आयडी वरून गुगल ड्राईव्ह च्या टाईमलाईन गेल्यावर कुरुंदकर आणि बिन्द्रेचे  एकत्र असलेले 50 फोटो आणि त्याच्या प्रिटाआऊट काढल्यानंतर त्यावर सह्या केल्या होत्या ते कोर्टासमोर दाखविल्यावर त्या आपणच काढल्या आहेत अशी साक्ष बंगेरा यांनी दिली. रोशन बंगेरा ची साक्ष पूर्ण झाली पुढील तारखेला दि.12 ऑगस्ट रोजी उलटतपासणी होणार आहे.आज कोर्टात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत , राजू गोरे ,  एसीपी संगिता शिंदे-अल्फान्सो  , नवी मुंबई क्राईम ब्रॅचचे आधिकारी कर्मचारी , आरोपीचे वकील आणि आरोपी हजर होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिस