शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 06:37 IST

अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात व्हिडीओ महत्त्वाचा दुवा

पनवेल - प्रेमसंबंधातून वाद वाढल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याने सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांचा खून करून मृतदेहाचे तुकडे वसईच्या खाडीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण, या दोघांतील वादाचे व्हिडीओ नातेवाइकांच्या हाती लागले आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दडपलेल्या गुन्ह्याला दोन वर्षांनी वाचा फोडली. 

अश्विनी गोरे-बिद्रे या २००६ मध्ये पोलिस दलात उपनिरीक्षकपदावर रुजू झाल्या. पुणे येथे पहिले पोस्टिंग मिळाले. त्यानंतर त्यांची सांगलीला बदली झाली. त्याच ठिकाणी त्यांची तत्कालीन पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्याशी ओळख झाली. पुढे दोघांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली झाली तरी प्रेमसंबंध सुरूच होते. हळूहळू दोघांमध्ये वादाचे खटके उडू लागले. तो अश्विनीला जिवे मारण्याची धमकी देत होता. तुझ्या नवऱ्याला गायब करेन, अशी भीती घालत होता. अखेर वाद विकोपाला गेला. 

अश्विनी भेटल्या आणि... एप्रिल २०१६ मध्ये अश्विनी कळंबोली पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. ११ एप्रिलला त्या कुरुंदकरला भेटायला ठाण्याला गेल्या. तिथे कुरुंदकर एकटाच राहत होता. दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर कुरुंदकरने अश्विनीच्या डोक्यात बॅट घालून तिचा खून केला. करवतीने मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. दुसऱ्या दिवशी रात्री मृतदेहाचे तुकडे मित्रांच्या सहाय्याने वसईच्या खाडीत फेकून दिले. 

तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त संगीता अल्फान्सो आणि विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांचा अश्विनी बिद्रे यांचे पती राजीव गोरे यांनी कोल्हापुरी फेटे बांधून सत्कार केला.

वादाचे व्हिडीओ समोर पोलिसी शिताफीने खून पचवल्याच्या अविर्भावात कुरुंदकर वावरत होता; पण, कळंबोलीतील तिच्या फ्लॅटमध्ये लॅपटॉप, मोबाइल मिळाला. त्यातून दोघांमधील वादाचे व्हिडीओ मिळाले. हेच पुरावे घेऊन गोरे-बिद्रे कुटुंबीय नवी मुंबई पोलिसांकडे गेले; पण त्यांनी दाद दिली नाही. अखेर अखेर उच्च न्यायालयाचा आदेशानंतर नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदविला. 

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणPoliceपोलिस