शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

अश्विनी बिद्रे हत्याकांड : चारही आरोपींना दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 21:53 IST

Ashwini Bidre Murder case : जामीन अर्ज फेटाळले ; यापुढील सुनावणी चालणार व्हिडीओ कॉन्फरन्सवर

ठळक मुद्देया सुनावणीवेळी  विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्यासमवेत एसीपी संगीत शिंदे अल्फान्सो, अश्विनी बिद्रेचे पती राजु गोरे आणि आरोपीचे वकील उपस्थित होते.

वैभव गायकर

पनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडातील चारही आरोपीना न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे.या प्रकरणाची सुनावणी बुधवारी पनवेल सत्र न्यायालयात पार पडली. यावेळी आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजु पाटील,कुंदन भंडारी व महेश फणशीकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली. आरोपींनी केलेले जामीन अर्ज न्यायमुर्ती माधुरी आनंद यांनी फेटाळले.     

कोविड १९ अंतर्गत सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आधारे जामीन मिळावा म्हणुन आरोपींनी जामीन अर्ज केला होता.आरोपींच्या या मागणीला विशेष सरकारी वकील  प्रदीप घरत यांनी विरोध दर्शवला होता. आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असुन या गुन्ह्यात फाशीची शिक्षा होवु शकते.या खटल्यातील मुख्य आरोपी कुरुंदकर हा पोलीस अधिकारी आहे.यातील दोन नंबरचा आरोपी राजकीय संबंधित आहे. त्यामुळे जर आरोपींना जामिनावर सोडले तर याचे परिणाम खटल्यावर होण्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील घरत यांनी केला होता.हे सर्व मुद्दे कोर्टाने गृहीत धरल्याने आरोपींना जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला. यापुढील सुनावणी हि व्हिडीओ कान्फरन्सद्वारे चालणार आहे. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी याकरिता अर्ज केला होता. या खटल्याची  पुढील सुनावणी ११ जुन रोजी व्हिडीओ कॉन्फरन्स ने चालणार आहे. या सुनावणीवेळी  विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्यासमवेत एसीपी संगीत शिंदे अल्फान्सो, अश्विनी बिद्रेचे पती राजु गोरे आणि आरोपीचे वकील उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय