शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अश्विनी बिद्रे प्रकरण: हवालदार विजय सोनावणे यांची कुरुंदकरच्या विरोधात साक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 07:38 IST

पुढील सुनावणी १२ फेब्रुवारीला होणार, त्याच्या मागणीनुसार या दोन्ही वस्तू मी त्याला आणून दिल्या होत्या. बॅटरी दीड हजार रुपयांना घेतली होती, अशी साक्ष पोलीस हवालदार विजय सोनावणे यांनी दिली. 

पनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडातील प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर याने सतूर (मोठा कोयता) आणि मोठी बॅटरी आणण्यासाठी आपल्यावर जबरदस्ती केली होती. त्यानंतर या दोन्ही वस्तू आपण त्याला आणून दिल्या, अशी साक्ष पोलीस हवालदार विजय सोनावणे यांनी पनवेल जिल्हा सत्र न्यायालयात शुक्रवारी दिली.

हाच सतूर कुरुंदकरने अश्विनी यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरला होता. पनवेल जिल्हा सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या न्यायालयात शुक्रवारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी तीन साक्षीदारांची सर तपासणी घेण्यात आली. आजच्या साक्षीदारांमध्ये पोलीस हवालदार विजय सोनवणे, धनाजी इंगळे आणि निवृत्ती कर्डेल यांचा समावेश होता. अश्विनी बिद्रे यांची ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी मी रजेवर होतो. मात्र, गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार विजय सोनवणे याने मी हजर आहे असे दाखवून त्यावर कुरुंदकरने स्वाक्षरी केली होती, असा गौप्यस्फोट कुरुंदकरचा शासकीय चालक पोलीस हवालदार धनाजी इंगळे यांनी शुक्रवारी न्यायालयात केला. ११ एप्रिल २०१६ च्या रात्री कुरुंदकर याने मटण कापण्याचा सतूर (मोठा कोयता) आणि लांब फोकस जाईल अशी बॅटरी आणण्यास मला सांगितले होते. त्याच्या मागणीनुसार या दोन्ही वस्तू मी त्याला आणून दिल्या होत्या. बॅटरी दीड हजार रुपयांना घेतली होती, अशी साक्ष पोलीस हवालदार विजय सोनावणे यांनी दिली.

या दोन्ही साक्षींमुळे कुरुंदकरच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. साक्षीदारांची सर तपासणी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी घेतली. यावेळी न्यायालयामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो, विनोद चव्हाण, अश्विनी यांचे पती राजू गोरे, आदी उपस्थित होते. पुढील सुनावणी येत्या १२ फेब्रुवारीला होणार आहे.

केस वर्षभरात संपविण्याचे आदेशही केस वर्षभरात संपविण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. अश्विनी बिद्रे गायब होण्यामागे वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांचा हात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे मागील सुनावणीदरम्यान हत्येच्या वेळी कुरुंदकर नेमके कुठे होते? याबाबतचे प्रश्न उपस्थित केले गेले.   

 

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणPoliceपोलिस