शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

Aryan Khan's drug case live updates: 'आर्यन खानला आज जामिन मिळणार नाही'; मित्राने म्हटले, शाहरुखने 'आशा' सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 16:26 IST

Aryan Khan Bail hearing in Drug Case: मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामिनावर सुनावणी सुरु आहे. एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि पूजा ददलानीचे नाव घेत आर्यनला जामिन देऊ नये अशी मागणी केली आहे. तर साक्षीदार पलटल्याशी आपला काहीही संबंध नाही असे प्रतिज्ञापत्र आर्यनच्या वकिलांनी दिले आहे.

महिन्याच्या सुरुवातीला शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला एनसीबीने मुंबईत क्रूझ रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतले होते. हा आर्यन आजवर तुरुंगात आहे. शाहरुखने जंग जंग पछाडूनही, तीन वकील बदलले तरी आज उच्च न्यायालयात आर्यनला जामिन मिळण्याची आशा सोडल्याचे त्याच्या एका जवळच्या मित्राने म्हटले आहे. (Mumbai Cruise Drugs Case)

मुंबई उच्च न्यायालयातआर्यन खानच्या जामिनावर सुनावणी सुरु आहे. एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि पूजा ददलानीचे नाव घेत आर्यनला जामिन देऊ नये अशी मागणी केली आहे. तर साक्षीदार पलटल्याशी आपला काहीही संबंध नाही असे प्रतिज्ञापत्र आर्यनच्या वकिलांनी दिले आहे. माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी आर्यनची केस लढत आहेत. या साऱ्या माहोलात शाहरुखच्या मन्नतवर वातावरण कसे आहे, हे शाहरुखच्या जवळच्या मित्राने सांगितले आहे. 

Aryan Khan's drug case live updates: रिया चक्रवर्ती, पूजा ददलानी आर्यन खानच्या 'वाटेत'; NCB ने हाय कोर्टात घेतले नाव

या मित्राने एका न्यूज चॅननला सांगितले की, शाहरुख खान आणि गौरी खान यांना आर्यनला आज जामिन मिळणार नाही असे वाटत असल्याचे म्हटले आहे. आर्यनला आज जामिन मिळणार नाही आणि हे प्रकरण आणखी काही दिवस चालेल. आणखी काही दिवस आर्यन समोरची संकटे वाढतील, असे शाहरुखला वाटत असल्याचे हा मित्र म्हणाला. 

कोर्टात काय घडले...आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान हायकोर्टात गोंधळ उडाला आहे. कोर्टात वकिलांची गर्दी वाढल्यानं न्यायमूर्ती नितीन सांब्रे न्यायासनावरून उठले. कोर्टातील कर्मचा-यांनी सर्वांना बाहेर काढलं असून पंधरा मिनिटांच्या व्यत्ययानंतर मीडिया आणि प्रकरणाशी संबंधित असलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

Sameer Wankhede : "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पूर्ण विश्वास, सत्य समोर येईल तेव्हा ते सत्याचीच बाजू घेतील"

आर्यनने मुंबई हायकोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात तो प्रभाकर साईलला ओळखत नाही किंवा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. अलीकडे जे आरोप-प्रत्यारोप होत आहेत, त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. आर्यन खानने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, हा एनसीबीचे अधिकारी आणि राजकीय लोकांमधील वाद आहे. मी एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर कोणताही आरोप केलेला नाही असं म्हटलं आहे. 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानShahrukh Khanशाहरुख खानMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीHigh Courtउच्च न्यायालय