Aryan Khan Drugs Case: मोठा ट्विस्ट! पूजा ददलानीचा मोबाईल हॅक करण्यासाठी मोठी ऑफर; हॅकरचे मुंबई पोलिसांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 02:34 PM2021-10-28T14:34:47+5:302021-10-28T14:35:28+5:30

Aryan Khan Drugs Case, Shahrukh Khan's Manager Pooja Dadlani: व्हॉट्स अॅप चॅटची बॅकअप फाईलही दाखविली. त्या फाईलचे नाव आर्यन खान चॅट असे होते. त्याला प्रभाकर साईलच्या नावे एक डमी सिम कार्ड देखील बनवायला सांगितले होते, असे या हॅकरने म्हटले आहे.

Aryan Khan Drugs Case: got offer on 6 October to hack Pooja Dadlani's mobile; Hacker Manish Bhangle letter to Mumbai Police | Aryan Khan Drugs Case: मोठा ट्विस्ट! पूजा ददलानीचा मोबाईल हॅक करण्यासाठी मोठी ऑफर; हॅकरचे मुंबई पोलिसांना पत्र

Aryan Khan Drugs Case: मोठा ट्विस्ट! पूजा ददलानीचा मोबाईल हॅक करण्यासाठी मोठी ऑफर; हॅकरचे मुंबई पोलिसांना पत्र

Next

आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरण जेवढे हाय प्रोफाईल आहे, तेवढेच मोठमोठे खुलासे केले (New Twist in Aryan Khan Case)  जात आहेत. आर्यन खानला 3 ऑक्टोबरला क्रूझवरून ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर लगेचच शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी आर्यनला सोडविण्याचे प्रयत्न करत होती. या काळात पूजाचा मोबाईल हॅक करण्याचे प्रयत्न काही लोकांकडून करण्यात आल्याचा दावा एका इथिकल हॅकरने केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आर्यन खानच्या जामिनावर आज तिसऱ्या दिवशीची सुनावणी सुरु होणार आहे. त्या आधीच हा मोठा गौप्यस्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. 

बुधवारी एका इथिकल हॅकरने मुंबई पोलिसांना ही माहिती दिली आहे. त्याला यासाठी 5 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा दावा या हॅकरने केला आहे. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिचा मोबाईल हॅक (Pooja Dadlani Phone Hack) करून तिचे कॉल डिटेल्स म्हणजेच सीडीआर काढण्यास त्याला सांगण्यात आले होते. पूजासोबत अन्य काही लोकांचे फोन हॅक करण्याची ऑफर देण्यात आली होती. यासोबतच त्याला आर्यन खानचे व्हॉट्स अॅप चॅट देखील दाखविण्यात आल्याचा दावा हॅकरने केला आहे. 

'फ्री प्रेस जर्नल'ने दिलेल्या वृत्तानुसार या हॅकरचे नाव मनीष भांगले आहे. त्याने पोलिसांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये आलोक जैन आणि शैलेश चौधरी यांची नावे घेतली आहेत. ६ ऑक्टोबरला या दोघांनी त्याच्याशी संपर्क केला होता. यावेळी त्यांनी मोबाईल हॅक करण्याची ऑफर दिली होती. शैलेशने भांगलेला व्हॉट्स अॅप चॅटची बॅकअप फाईलही दाखविली. त्या फाईलचे नाव आर्यन खान चॅट असे होते. त्याला प्रभाकर साईलच्या नावे एक डमी सिम कार्ड देखील बनवायला सांगितले होते, असे म्हटले आहे. मात्र, मनीषने म्हटले की मी हे काम केले नाही. काही दिवसांनी जेव्हा बातम्यांमध्ये प्रभाकर साईलचे नाव ऐकले तेव्हा पोलिसांना याची कल्पना द्यावी, असा विचार केल्याचे तो म्हणाला. आर्यन खानच्या जामिनावर आज तिसऱ्या दिवशीची सुनावणी सुरु होणार आहे. त्या आधीच हा मोठा गौप्यस्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. 

Web Title: Aryan Khan Drugs Case: got offer on 6 October to hack Pooja Dadlani's mobile; Hacker Manish Bhangle letter to Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.