शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

Aryan Khan Drugs Case: आर्यनवरील कारवाई टाळण्यासाठी २५ कोटींचे डील?, साक्षीदाराचा गौप्यस्फोट; एनसीबीचा इन्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 07:20 IST

Aryan Khan Drugs Case: साइल हा एनसीबीच्या केसमधला ९ पंचापैकी एक पंच आहे. सध्या विविध गुन्ह्यांत फरारी असलेल्या किरण गोसावी याचा अंगरक्षक म्हणून तो काम करीत होता.

मुंबई : कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवरील कारवाईमुळे पहिल्या दिवसापासून विविध आरोपांना सामोरे जावे लागणाऱ्या  अमली पदार्थ नियंत्रण कक्षाला (एनसीबी) रविवारी याप्रकरणी मोठा धक्का बसला आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यावरील कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न झाला होता. त्यासाठी  २५ कोटींची मागणी होऊन  १८ कोटींवर तडजोड होऊन  त्यातील ८ कोटी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना दिले जाणार होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट या कारवाईत पंच साक्षीदार  असलेल्या प्रभाकर साइल याने केला आहे. नोटरी केलेले  प्रतिज्ञापत्र सादर करून त्याने हे आरोप केले आहेत. 

साइल हा एनसीबीच्या केसमधला ९ पंचापैकी एक पंच आहे. सध्या विविध गुन्ह्यांत फरारी असलेल्या किरण गोसावी याचा अंगरक्षक म्हणून तो काम करीत होता. हा व्यवहार गोसावी, सॅम व शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानी यांच्यात ३ ऑक्टोबरला पहाटे झाला होता. त्यातील ५० लाख रुपयांची रोकड मी गोसावीकडे आणून दिली होती. त्यानंतर पूजाने फोन न उचलल्याने हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही, असा दावा त्याने केला आहे. ३ ऑक्टोबरला पहाटे साडेतीन-चारच्या दरम्यान आम्ही लोअर परेळच्या दिशेने गेलो. तिथे ब्रिजखाली आमची गाडी जाऊन उभी राहिली. पाठीमागून इनोव्हा कार आली. अचानक त्या गाडीमागे निळ्या रंगाची मर्सिडीज आली. मी जाऊन बघितले तर त्या गाडीत पूजा दादलानी  बसलेली होती. त्या तिघांमध्ये बैठक झाली.

या बैठकीत त्यावेळी काय झाले, हे मला समजले नाही. गोसावी पुन्हा गाडीत येऊन बसले.  तेव्हा त्यांनी फोन केला. २५ सांग, शेवटी १८ फायनल कर, कारण त्यातील ८ समीर वानखेडेंना जाणार आहेत. १० आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, असे गोसावी फोनवर बोलत होते. मी त्यांचे एवढे फोनवरचे संभाषण ऐकले, असे साइलने व्हिडिओमध्ये सांगितले. या व्हिडिओमध्ये साइलने समीर वानखेडे यांच्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

साइलचे प्रतिज्ञापत्र आणि हे संपूर्ण प्रकरण कथन करणारा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर रविवारी व्हायरल झाला. त्यामुळे एनसीबीबरोबरच राजकीय  वर्तुळात मोठी  खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी या घटनेमुळे एनसीबी व केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप नेत्यांनीही टीकेला उत्तर  दिले.  एनसीबीने साइलचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी ते न्यायालयात बाजू मांडणार  आहेत. दिवसभर याप्रकरणाची चर्चा रंगली.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी