Aryan Khan Drug Case: आर्यन तुरुंगात, आता अनन्याची चौकशी; मोबाईल, लॅपटॉप ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 07:14 AM2021-10-22T07:14:44+5:302021-10-22T07:15:29+5:30

एनसीबीची पथके वांद्रे व अंधेरीत अनुक्रमे अभिनेता शाहरुख खान व अनन्याच्या घरी गेली. ड्रग्ज पार्टीशी संबंधित आणखी तपास करण्यासाठी वैद्यकीय, शैक्षणिक कागदपत्रे, तसेच परदेशातील वास्तव्याबद्दल माहिती देण्याची मागणी नोटिसीत आहे.

Aryan Khan Drug Case Ananya Panday Questioned by ncb | Aryan Khan Drug Case: आर्यन तुरुंगात, आता अनन्याची चौकशी; मोबाईल, लॅपटॉप ताब्यात

Aryan Khan Drug Case: आर्यन तुरुंगात, आता अनन्याची चौकशी; मोबाईल, लॅपटॉप ताब्यात

Next

मुंबई : ड्रग्ज पार्टीप्रकरणी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच, गुरुवारी अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अभिनेत्री अनन्या हिच्याकडे चौकशी केल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. शुक्रवारी पुन्हा चौकशीसाठी तिला बोलावले आहे.
तिचा मोबाईल, लॅपटॉप ताब्यात घेतला आणि शाहरुखच्या मन्नत निवासस्थानी नोटीसही बजावली आहे.

एनसीबीची पथके वांद्रे व अंधेरीत अनुक्रमे अभिनेता शाहरुख खान व अनन्याच्या घरी गेली. ड्रग्ज पार्टीशी संबंधित आणखी तपास करण्यासाठी वैद्यकीय, शैक्षणिक कागदपत्रे, तसेच परदेशातील वास्तव्याबद्दल माहिती देण्याची मागणी नोटिसीत आहे.

मुलाच्या भेटीसाठी शाहरुख कारागृहात
आर्थर रोड कारागृहात असलेला मुलगा आर्यनला भेटण्यासाठी बॉलिवूड किंग शाहरुख खान गुरुवारी कारागृहात पोहोचला. सर्वसामान्यांप्रमाणे त्यालाही आर्यनसोबत भेटण्यासाठी १० मिनिटांची वेळ देण्यात आली. यावेळी आर्यनला अश्रू अनावर झाल्याचेही समजते. त्यांच्यात संभाषणादरम्यान दोघांमध्ये काच होती. दोन्ही बाजूंनी इंटरकॉमवरून संवाद केला.   

आर्यनच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी
आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने २६ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे. 
दरम्यान, विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन व अन्य आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. २६ ऑक्टोबर रोजी आर्यनसह मुनमुन धमेचा हिच्याही जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येईल.
आर्यनच्या ड्रग्ज चॅटमध्ये अनन्याचे नाव असल्याने तिच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात अन्य काही ‘सेलिब्रेटीं’कडे चौकशी होणार आहे.

Web Title: Aryan Khan Drug Case Ananya Panday Questioned by ncb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.