आर्यन खानची २६ दिवसांनी होणार जेलमधून सुटका; जामिनाची प्रत हायकोर्टाने केली जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 04:14 PM2021-10-29T16:14:43+5:302021-10-29T16:15:39+5:30

Aryan Khan Bail Order released :दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हजेरी लावणे, एनडीपीएस कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ नये, अशा एकही अटीशर्ती हायकोर्टाने लागू केल्या आहेत. 

Aryan Khan to be released from jail in 26 days; A copy of the bail was issued by the High Court | आर्यन खानची २६ दिवसांनी होणार जेलमधून सुटका; जामिनाची प्रत हायकोर्टाने केली जारी

आर्यन खानची २६ दिवसांनी होणार जेलमधून सुटका; जामिनाची प्रत हायकोर्टाने केली जारी

Next

अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह मुंबईउच्च न्यायालयाने सुटका केली आहे. आर्यनसह अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचाच्या जामीन अर्जावरील निकालाची प्रत हायकोर्टाकडनं जारी केली. मुंबईउच्च न्यायालयाने प्रत्येकी १ लाखाच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश देत कठोर अटीशर्तीही लागू केल्या आहेत. निकालाची प्रत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष NDPS कोर्टात सादर होताच कोर्ट सुटकेचे आदेश देणार आहे. त्यानंतर आर्यन खानची जेलमधून सुटका होऊन २६ दिवसांनी आपली घरी रवानगी होणार आहे.

१४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयाने आज (२९ ऑक्टोबर) याबाबत सविस्तर निकालपत्र दिलं. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) न्यायालयाने जामीन देण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे आता आज आर्यन खान तुरूंगाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे. आरोपींनी त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार जे गुन्हे दाखल आहेत. त्या किंवा तशा इतर कोणत्याही कृतीमध्ये सहभागी होऊ नये. तसेच आरोपींनी या गुन्ह्यातील सहआरोपी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क साधू नये, तसेच दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हजेरी लावणे, एनडीपीएस कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ नये, अशा एकही अटीशर्ती हायकोर्टाने लागू केल्या आहेत. 

Web Title: Aryan Khan to be released from jail in 26 days; A copy of the bail was issued by the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.