शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

अरुण गवळीच्या नावाने खंडणीची मागणी; चौघांना अंबोली पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 01:54 IST

कुख्यात अंडरवर्ड डॉन अरुण गवळी याच्या नावाने खंडणी मागणाऱ्या चौघांच्या मुसक्या शनिवारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने आवळल्या आहेत. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

मुंबई : कुख्यात अंडरवर्ड डॉन अरुण गवळी याच्या नावाने खंडणी मागणाऱ्या चौघांच्या मुसक्या शनिवारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने आवळल्या आहेत. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. संजय वोर्पे (४४), निवृत्ती यादव (३८), संतोष शिरूरकर (३४) आणि ईश्वर शिंदे (२२) अशी अटक आरोपींची नावे आहेत.उत्तर प्रदेशमधील मॉडर्न पब्लिक स्कूलमध्ये बाल दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यातील तक्रारदार करणसिंग (२८) हे कार्यक्रमासाठी कलाकार उपलब्ध करून देण्याचे काम करतात. त्यामुळे १६ आॅक्टोबर रोजी ‘शुभमंगल इव्हेंट’ कंपनीतून करणसिंग यांना अजय शर्मा यांचा फोन आला. कार्यक्रमात अभिनेत्री अमिषा पटेल यांना बोलाविण्याची विनंती शर्मा यांनी केली. त्यानुसार, अमिषाचे मॅनेजर अनिल जैन यांना करणसिंगनी फोन केला. तेव्हा अमिषाला कार्यक्रमासाठी ५ लाख द्यावे लागतील, असे त्यांनी सांगितले. करणसिंग यांनी शर्माला फोन करून ५ लाख अमिषाला आणि त्यांच्या कमिशनचे १ लाख असा एकूण ६ लाख रुपयांचा खर्च येईल, असे सांगितले. शर्माने ६ लाख रुपये करणसिंग यांना दिले. त्यांनी त्यातील ५ लाख रुपये २० आॅक्टोबरला जैनला दिले. मात्र, कार्यक्रमाला अमिषा न आल्याने करणसिंग यांनी जैनकडे विचारणा केली. तेव्हा पैसे परत न दिल्यास कायदेशीर कारवाई करा, असे जैन, अमिषाचा कायदेशीर सल्लागार दिनेश पाल यांनी सांगितले.त्यानंतर, १५ नोव्हेंबरला करणसिंग यांना अनोळखी नंबरवरून फोन आला. रात्री साडेअकराच्या सुमारास अंधेरीच्या इन्फिनिटी मॉलजवळ भेटायला बोलावले. त्या वेळी ‘पोलीस’ लिहिलेल्या गाडीत चौघे आरोपी बसले होते. त्यातील वोर्पे याने अखिल भारतीय सेनेचे कार्ड दाखवत आम्ही अरुण गवळीसाठी काम करतो, असे सांगितले. मॉडर्न स्कूलच्या कामाचे पैसे परत कर, अन्यथा तुला १० लाख रुपये द्यावे लागतील. नाहीतर तुला आम्ही ठार मारू, असे धमकावले, तसेच १६ नोव्हेंबरला पैसे तयार आहेत का, अशी विचारणा करणारा फोन करण्यात आला. पैसे देण्याची तयारी करणसिंग यांनी दाखविली. मात्र, जिवाच्या भीतीने या विरोधात अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार, सापळा रचून एक लाखांची रक्कम घेताना अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने चौघांना अटक केली.

टॅग्स :ExtortionखंडणीCrime Newsगुन्हेगारी