शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

क्राइम पेट्रोलचा कलाकार बनला चोर, आठ गुन्ह्यांची उकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 02:05 IST

Crime News : एटीएम सेंटरमधून पैसे काढून देताना हातचलाखीने कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या पाच आरोपींच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी पकडले आहे.

नालासोपारा  - एटीएम सेंटरमधून पैसे काढून देताना हातचलाखीने कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या पाच आरोपींच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी पकडले आहे. यात ८ गुन्ह्यांची उकल करून विविध बँकेची ६० एटीएम कार्ड, गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षा, दुचाकी असा एकूण २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील एक आरोपी मालिका, वेबसीरिज आणि क्राईम पेट्रोलमधील कलाकार असून कोरोनाच्या काळात काम मिळत नसल्याने चोर बनला असल्याचे उघड झाले आहे. (Artist of crime patrol became a thief, police arrest him & solving eight crimes)आयुक्तालयाच्या परिसरात एटीएम सेंटरमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली होती. यामुळे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील यांनी आरोपींचा शोध घेऊन पायबंद करण्यासाठी आदेश दिले होते. गुन्हे  शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांना या टोळीबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यांच्या युनिटच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टीमने धर्मेंद्रकुमार दुबे (४०), अजय शर्मा (३३), बबलू  सरोज (३५), जितेंद्रकुमार चमार (२४) आणि ब्रिजेश चौहान (२२) या पाच जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर विविध बँकेचे ६० एटीएम कार्ड्स, गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षा, दुचाकी असा २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींकडून विरार ३, तुळींज १, वालीव १, नारपोली १, कापूरबावडी १, भिवंडी शहर १ अशी ८ गुन्ह्यांची उकल केली आहे. तसेच या टोळीने वालीव, विरार, ठाणे, भिवंडी, मुंबई, डुंगरा, वापी, गुजरात या ठिकाणी गुन्हे केल्याचे चौकशीत सांगितले आहे.  आरोपीपैकी अजय शर्मा हा टीव्ही कलाकार असून त्याने क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया, गणेशा, या मालिकांमध्ये व काही वेब सीरिजमध्ये काम केलेले आहे. 

गुप्त माहितीच्या आधारे पाच जणांच्या टोळीला पकडले आहे. त्यांच्याकडून ८ गुन्ह्यांची उकल करून विविध कंपनीचे ६० एटीएम कार्ड जप्त केले असून एक आरोपी टीव्ही कलाकार आहे. आरोपींना गुन्ह्याच्या तपासासाठी विरार पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. - प्रमोद बडाख, पोलीस निरीक्षक,गुन्हे शाखा, युनिट-३

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCrime patrol Showक्राइम पेट्रोलThiefचोर