शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तुझी बायको पांढऱ्या पायाची, तू आमदारही होणार नाहीस; असा 'सल्ला' देणाऱ्या 'गुरू'ला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 23:07 IST

Pune Crime News: प्रतिष्ठीत कुटुंबाला सुनेचा छळ करायला प्रवृत्त केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी आध्यात्मिक गुरु यांना अटक केली आहे.

पुणे - तुझी बायको पांढऱ्या पायाची आहे. तिचे ग्रहमान दुषित झाले आहे. जर तुझी ही बायको म्हणून कायम राहिली तर तू आमदार, मंत्रीही होणार नाही, तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी देत, असे सांगून प्रतिष्ठीत कुटुंबाला सुनेचा छळ करायला प्रवृत्त केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी आध्यात्मिक गुरुला अटक केली आहे.

रघुनाथ राजाराम येमुल (वय ४८, रा. धवलगिरी अपार्टमेंट, बाणेर) असे या आध्यात्मिक गुरुचे नाव आहे. रघुनाथ येमुल यांचे शेकडो भक्त असून त्यामुळे पुणे शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.याप्रकरणी एका महिलेने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यात चतु:श्रृंगी पोलिसांनी गणेश ऊर्फ केदार गायकवाड, नानासाहेब गायकवाड, नंदा गायकवाड, सोनाली गवारे, दीपक गवारे, भागीरथी पाटील, राजू अंकुश अशा ८ जणांवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास करीत असताना हा प्रकार समोर आला आहे.

फिर्यादी या डिसेंबर २०१९ मध्ये रात्री आपल्या बाळासह बेडरुममध्ये झोपल्या असताना त्यांना कुजबुजण्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता तेथे सोनाली व दीपक गवारे हे बेडरुमच्या बाहेर हळदी कुंकु लावलेल्या टचण्या मारलेल्या लिंबु एका पिशवीमध्ये ठेवताना त्यांना दिसले. त्यांनी हा प्रकार आपले पती गणेश यांना सांगितला. त्यानंतर गणेश याने फिर्यादी यांना सांगितले की, रघुनाथ येमुल हे माझे गुरु आहेत. व त्यांनी तू अवदसा असून, पांढर्या पायगुणाची आहे. तिची जन्मवेळ चुकीची आहे. त्यामुळे सर्व ग्रहमान दुषित झाले आहेत. जर तुझी ही बायको म्हणून अशीच कायम राहिली तर तू आमदार ही होणार नाही व मंत्रीही होणार नाहीस. त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगाही तिच्याकडून काढून घे. तसेच मी देतो हे लिंबू उतरविल्याने तुझ्या मागची ही पिडा कायमची निघून जाईल. त्यामुळे गणेशने येमुल यांनी दिलेले लिंबु फिर्यादीवरुन उतरवून टाकले. याची माहिती मिळाल्यावर चतु:श्रृंगी पोलिसांनी रघुनाथ येमुल यांना अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPuneपुणे