कोब्रा नागाला ठार मारणाऱ्यास अटक; ठाणे वनविभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 14:27 IST2020-03-19T14:27:11+5:302020-03-19T14:27:19+5:30
ठाणे वन विभागामार्फत केलेल्या पाहणीत कोब्रा नाग मृतावस्थेत मिळून आला.

कोब्रा नागाला ठार मारणाऱ्यास अटक; ठाणे वनविभागाची कारवाई
ठाणे: कोब्रा नागाला काठीच्या साहाय्याने मारून टाकणाऱ्या वैझीनाथ विश्वनाथ गायकवाड याला ठाणे वन विभागाने बुधवारी अटक केली आहे. ही घटना घोडबंदर रोडवरील मानपाडा परिसरात घडली आहे. नागाला मारण्याचे कारण समजू शकले नाही अशी माहिती वन विभागाने दिली.
हॅलो फॉरेस्ट या संकेतस्थळावर मंगळवारी 17 मार्च रोजी आलेल्या तक्रारीनुसार ठाणे वन विभागामार्फत केलेल्या पाहणीत कोब्रा नाग मृतावस्थेत मिळून आला. यावेळी दिलेल्या कबुली जबाबानुसार चौकशीसाठी वैझीनाथ याला ताब्यात घेत बुधवारी गुन्हा दाखल करत अटक केली. न्यायालयात हजर केले असता, 14 दिवसांची कोठडी सुनावल्याचे वन विभागाने सांगितले.