शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

भांडणाचा राग मनात धरून खून करणाऱ्या ८ वर्षे फरार मुख्य आरोपीला यूपीतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 17:47 IST

मंगेश कराळे नालासोपारा :- मागील भांडणाचा राग मनात धरून २१ वर्षीय तरुणाचा खून करून मागील आठ वर्षांपासून फरार असणाऱ्या मुख्य ...

मंगेश कराळे

नालासोपारा :- मागील भांडणाचा राग मनात धरून २१ वर्षीय तरुणाचा खून करून मागील आठ वर्षांपासून फरार असणाऱ्या मुख्य आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे. 

तुळींज येथे १८ मार्च २०१६ साली सुभाषचंद्र उर्फ भालू रामसागर गुप्ता (२१) याचा शिवाभैया, रवि श्यामवीर डांगुर, अभिजित मिश्रा उर्फ कडा उर्फ सचिन आणि कृष्णा कमलेश दुबे या चार मित्रांनी आपसात संगनमत करत दारू पाजून नायलॉन रश्शीने गळा दाबून खून केला होता. त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या ईरादयाने गोणीत भरुन त्याचे अंगावर असलेल्या सोन्याची चेन व हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी व दुचाकीचा अपहार करुन आरोपी पळून गेले होते. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून १ अल्पवयीन व २ असे ३ आरोपींना अटक केली होती. पण मुख्य आरोपी शिवाभैया हा फरार होता. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध गंभीर गुन्हयांतील पाहीजे व फरार निष्पन्न परंतु नजेराआड असणारे आरोपींचा शोध घेवून अटक करण्याबाबत वरीष्ठांनी सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे तुळींज पोलीस ठाण्यातील या गुन्हयाचे तपास व अटक केलेल्या आरोपींची माहिती प्राप्त केली.

मुख्य पाहीजे आरोपी व गुन्हयाचे घटनेच्या प्रकाराबाबत सविस्तर माहीती प्राप्त करुन तो यूपी येथील राहणारा असुन त्याचे हातावर असलेल्या टॅटुचे आणि बरेच वर्षापुर्वीचा जुना अस्पष्ट फोटो प्राप्त केला. आरोपीचा फोटो आणि त्याचे हातावरील टॅटुचे वर्णनावरुन शोध चालू झाला. प्राप्त जुना फोटो आणि टॅटुचे वर्णनाशी मिळता-जुळता व्यक्ती मजरा चिल्लीमल याठिकाणी वास्तव्यास असल्याची माहीती प्राप्त झाल्याने तात्काळ गुन्हे शाखा युनिट दोनचे तपास पथक चित्रकुट येथे रवाना करुन आरोपीला २७ ऑगस्टला ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केल्यावर त्याने ८ वर्षांपूर्वी गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक केलेल्या आरोपीचे नाव शिवबाबु उर्फ शिवाभैया जगतपाल निषाद (२०) असे आहे. सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले,  संजय नवले, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांतकुमार ठाकुर, अमोल कोरे तसेच पोलीस उपनिरीक्षक राजेश कुमार राय, महेंद्रकुमार यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी