शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
3
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
4
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
5
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
6
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
7
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
8
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
9
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
10
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
11
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
12
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
13
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
15
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
16
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
17
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
18
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
19
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
20
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!

खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक, ‘राज्य जीएसटी’ची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 05:01 IST

Crime News :बाबुशा शरणप्पा कसबे असे अटक केलेल्याचे नाव आहे. कसबे यांनी मे. खुशी टेंडर्स वस्तू व सेवाकर कायदा २०१७ अंतर्गत नोंदणी दाखला घेतला.

पुणे : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांविरुद्ध कारवाई सुरू केली असून, ११० कोटींपेक्षा अधिक रकमेची खोटी बिले दिल्याप्रकरणी पुण्यातील एका व्यापाऱ्यास राज्य जीएसटी विभागाकडून अटक करण्यात आली  आहे. राज्यात आत्तापर्यंत अशा ३ कारवाया करण्यात आल्या आहेत. बाबुशा शरणप्पा कसबे असे अटक केलेल्याचे नाव आहे. कसबे यांनी मे. खुशी टेंडर्स वस्तू व सेवाकर कायदा २०१७ अंतर्गत नोंदणी दाखला घेतला. या कंपनीच्या माध्यमातून कसबे याने ११० कोटी रकमेची फक्त बिले देऊन १६.८६  कोटींचा आय.टी.सी पुढील खरेदीदारांना पाठवला. त्याचप्रमाणे हा कर भरायला लागू नये यासाठी अनेक बोगस कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या  प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय  दाखवलेल्या बोगस खरेदी बिलातून सुमारे १६.५७ कोटी रकमेचा इनपुट टॅक्स जमा करून घेतल्याचे  उघडकीस आले. मुख्य न्यायदंडाधिकारी पुणे यांच्या  न्यायालयाने या व्यापाऱ्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.  हे कृत्य  अजामीनपात्र  असून, वस्तू व सेवाकर कायदा २००७ नुसार ५ वर्षे तुरुंगवास आहे. जीएसटी विभागाच्या वतीने महेश झंवर यांनी कामकाज पाहिले. राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त दत्तात्रय आंबेराव, सहायक राज्यकर आयुक्त दत्तात्रय तेलंग यांच्या प्रयत्नातून ही अटक करण्यात आली.

राज्य वस्तू व सेवाकर विभागाला कारवाईदरम्यान बोगस कंपन्यांची माहिती मिळाली आहे. त्यांच्याविरुद्ध आगामी काळात कारवाई केली जाणार आहे.- दत्तात्रय आंबेराव, राज्यकर उपायुक्त.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGSTजीएसटी