फसवणूक करणाऱ्या बिल्डरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 23:28 IST2019-08-29T23:28:35+5:302019-08-29T23:28:52+5:30
जवळपास १४ महिने फरार असलेल्या आनंद कदमला गुन्हे शाखेने बुधवारी घोडबंदरमधून अटक केली आहे.

फसवणूक करणाऱ्या बिल्डरला अटक
नवी मुंबई : कमी किमतीमध्ये घर देण्याचे आमिष दाखवून ५०० पेक्षा जास्त ग्राहकांची फसवणूक करणाºया बिल्डरविरोधात एका वर्षापूर्वी वाशीमध्ये गुन्हा दाखल केला होता. जवळपास १४ महिने फरार असलेल्या आनंद कदमला गुन्हे शाखेने बुधवारी घोडबंदरमधून अटक केली आहे.
रिलायन्स कन्स्ट्रक्शन व रियल बिल्डकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे संचालक आनंद कदम व पत्नी कविता कदम यांनी कर्जतमधील कोंठिबे येथे लिबर्टी हॉरिजन व टेन स्क्वेअर या नावाने व अलिबाग येथे मीरा आणि कर्जतमधील बेंडसे येथे कोरल लेक हे प्रकल्प सुरू करत असल्याची जाहिरात केली होती. मी किमतीमध्ये घर देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून बुकिंगसाठी पैसे घेण्यास सुरुवात केली होती. ५०० पेक्षा जास्त ग्राहकांनी करोडो रुपये त्याच्याकडे जमा केले; परंतु प्रत्यक्षात प्रकल्प न उभे करता त्याने सर्वांची फसवणूक केली होती. त्याच्याविरोधात जून २०१८ मध्ये वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने अॅस्पायर होम्स फायनान्स कंपनीकडूनही करोडो रुपये घेऊन त्यांचीही फसवणूक केली होती. त्या प्रकरणी दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून आनंद कदम फरार होता. नवी मुंबई गुन्हे शाखेचे उपआयुक्त प्रवीण पाटील, सहायक आयुक्त अजय कदम, आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अतुल लंबे यांनी या आरोपीचा शोध सुरू केला होता. २७ आॅगस्टला घोडबंदरमधून त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन
च्संबंधित कंपनीने कोणाची फसवणूक केली असेल तर त्यांनी गुन्हे शाखा कक्ष-१ शी संपर्क साधावा, नागरिकांनी कमी किमतीमध्ये घर देण्याचे आमिष दाखविल्यानंतर तत्काळ विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.