शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Arnab Goswami: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबागच्या न्यायालयात हजर करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 14:41 IST

Arnab goswami will produce in Alibaug Court News: अन्वेय नाईक (५३) यांनी शनिवारी, ५ मे रोजी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील फार्म हाउसवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

आविष्कार देसाई                     

रायगड : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पाेलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी मुंबईतून अटक केली.  मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वेय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. अलिबागच्या न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे. त्याआधी अलिबाग पाेलिस ठाण्यात गाेस्वामी यांना हजर करण्यात येईल त्यानंतर त्याची जिल्हा सरकारी रुग्णालयात आराेग्य तपासणी झाल्यावर अलिबागच्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील एँड. भूषण साळवी यांनी लाकेमतशी बाेलताना दिली.

अन्वेय नाईक (५३) यांनी शनिवारी, ५ मे रोजी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील फार्म हाउसवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची आई कुमुद नाईक (८४) त्यांचाही मृतदेह तेथेच आढळून आला होता. अन्वय यांची कॉनकॉर्ड कंपनी इंटेरिअर डिझायनरचे काम करते. अन्वेय यांच्या कंपनीने रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी काम केले होते. केलेल्या कामाचे पैसे त्यांच्याकडून सातत्याने अन्वेय यांनी मागितले होते. मात्र, अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा ते देण्यास टाळाटाळ करत होते, तर दुसरकडे अन्वेय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिकांकडून माल उचलला होता त्यांनीही पैशाचा तगादा लावला होता, परंतु केलेल्या कामाचे पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येत हाेती. अन्वेय यांनी आपल्या सुसाईड नाेटमध्ये हा खुलासा केला हाेता. पाेलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाला वेग आला हाेता मात्र हायप्राेफाईल केस असल्याने पाेलिसही जपून पावले टाकत हाेते. त्यानंतर अन्वेय यांच्या मृत्यूच्या तपासाला गती येत नव्हती. या कालावधीत राज्यामध्ये भाजपाचे सरकार हाेते.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना पोलिसांनी केली अटक  

सत्तांतर झाल्यानंतर अन्वेय यांच्या कुटूंबाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे दाद मागीतली हाेती. त्यानंतर तपासाला पुन्हा वेग आला हाेता.बुधवारी पहाटेच अलिबाग पाेलिसांचे विशेष पथक मुंबई पाेलिसांच्या मदतीने गाेस्वामी यांच्या घरी पाेहचले. त्यावेळी गाेस्वामी यांनी प्रतिकार केला. शेवटी त्यांना पाेलिसांनी अटक केली आणि ते अलिबागच्या दिशेन रवाना झाले आहेत. काही वेळातच गाेस्वामी यांना अलिबागच्या पाेलिस ठाण्यात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची जिल्हा सरकारी रुग्णालयात आराेग्य तपासणी करण्यात येणार आहे. नंतर अलिबागच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गाेस्वामी यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने रायगड पाेलिसांनी बंदाेबस्तामध्ये वाढ केली आहे. पालघर, रत्नागिरी जिल्ह्यातून पाेलिसांची जादा कुमक मागवल्याची माहिती सुत्रांनी दिली.                  

 

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीPoliceपोलिस