शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

Arnab Goswami : अर्णब गोस्वामींना जामीन की कोठडीच?; जोरदार युक्तिवाद सुरू

By पूनम अपराज | Updated: November 7, 2020 14:10 IST

Arnab Goswami : आज सुनावणी पूर्ण न झाल्यास पुढची सुनावणी दिवाळी सुटीनंतर २३ नोव्हेंबरला ठेवू, न्या. शिंदेंनी वकील अगरवालांना सांगितले.

ठळक मुद्देअलिबाग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाविषयी आम्ही काहीही म्हणणार नाही किंवा निरीक्षण नोंदवणार नाही. कारण त्या आदेशाविरोधात राज्य सरकारने सत्र न्यायालयात फेरविचार अर्ज केला आहे. आम्ही काहीही निरीक्षण नोंदवणे हे आमच्या बाजूने योग्य होणार नाही, असे न्या. शिंदें

अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक झाली असून त्यांना स्थानिक कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याविरोधात गोस्वामी यांनी हायकोर्टात धाव घेतली असून अर्णब यांच्यावतीने आज ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मांडत आहेत. तसेच ज्येष्ठ वकील पोंडा अर्णब यांची बाजू मांडत आहेत. सुनावणीदरम्यान न्या. एस एस शिंदे यांनी महत्वाचे निरीक्षण नोंदवत अन्वय नाईक कुटुंबियांचे म्हणणे न ऐकता क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे अलिबाग येथे जिल्हा सत्र न्यायालयात अर्णब यांच्या पोलीस कोठडीसाठी झालेल्या सुनावणीदरम्यान तिन्ही वकिलांनी जिल्हा सत्र न्यायालयात रिविजन कॉपी मराठीऐवजी इंग्रजीत देण्याची विनंती केली. त्यावर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी हे केवळ टाईमपाससाठी केलं जात असल्याचं म्हटलं आहे. याबाबतची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी येत्या सोमवारी म्हणजेच ९ नोव्हेंबरला घेण्यात येईल.    

 

तसेच मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान ‘सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे आम्हाला कायदेशीर प्रक्रियाही लक्षात घ्यायला हवी. आम्हालाही मर्यादा आहेत. आम्ही हे सर्व केवळ कायद्यातील तरतुदींविषयी बोलतोय. आम्ही अद्याप याविषयी आमचे मत बनवलेले नाही. या मुद्द्यांवर तुमचे सहाय्य हवे आहे’, असे न्या. शिंदे आरोपी सारडाचे वकील अगरवाल यांना म्हणाले.  ‘तुम्हाला फौजदारी दंड संहितेच्या कलम ४३९ अन्वये मुंबई हायकोर्टाकडून नियमित जामिनाच्या कायदेशीर प्रक्रियेंतर्गत अर्ज करून अंतरिम जामीन मिळवण्याचा पर्याय आहे. मग तुम्ही हेबियस कॉर्पसच्या पीटिशनमध्ये अंतरिम जामिनासाठी विनंती करणे योग्य आहे का?’ असे न्या. शिंदेंनी निरीक्षण नोंदवले. ‘मी केवळ २७ वर्षांचा आहे. मी मालकांपैकी एक आहे. माझा कंपनीत खूप कमी हिस्सा आहे. यापूर्वीही हे प्रकरण सुरू होते, तेव्हा मला पोलिसांनी खूप वेळा चौकशीसाठी बोलावले. आता पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने अटक केली. त्यामुळे मला अंतरिम सुटकेचा दिलासा द्यावा’, अशी आरोपी सारडातर्फे वकील अगरवाल यांनी उच्च न्यायालयात विनंती केली.   

Arnab Goswami : अर्णब यांची बाजू मांडताना हरीश साळवे यांनी ठाकरे सरकारवर केले आरोप ‘आम्ही अशी विनंती मान्य करून अंतरिम सुटकेचा आदेश केला तर कायदेशीर प्रक्रियेने कनिष्ठ न्यायालयांना असलेले महत्त्व कमी केल्यासारखे होईल. शिवाय नियमित जामिनाचा पर्याय असला तरी थेट मुंबई हायकोर्टात जाऊन जामीन मिळवता येऊ शकतो, असा चुकीचा पायंडा पडणार नाही का?’ असा सवाल न्या. शिंदे यांनी केला आहे.  ‘यापूर्वी रिट याचिकांमध्ये हायकोर्टाने अटकेतील आरोपीच्या सुटकेचे आदेश केलेले आहेत. सुप्रीम कोर्टाला अनुच्छेद ३२ अन्वये आपल्या विशेषाधिकारात आदेश करण्याचा अधिकार तर हायकोर्टाला अनुच्छेद २२६ अन्वये सुटकेचा आदेश करण्याचा अधिकार असल्याचे वकील अगरवाल यांनी इतर निवाड्यांचा संदर्भ देत सांगितले. 

केवळ अंतरिम सुटकेच्या संदर्भात सुनावणी होईल, असे काल ठरले होते. त्यामुळे तुम्हाला असाच युक्तिवाद सुरू ठेवून अधिक वेळ घ्यायचा असल्यास हरकत नाही. उद्या पुन्हा सुनावणी ठेवणार नाही. आज सुनावणी पूर्ण न झाल्यास पुढची सुनावणी दिवाळी सुटीनंतर २३ नोव्हेंबरला ठेवू, न्या. शिंदेंनी वकील अगरवालांना सांगितले. अलिबाग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाविषयी आम्ही काहीही म्हणणार नाही किंवा निरीक्षण नोंदवणार नाही. कारण त्या आदेशाविरोधात राज्य सरकारने सत्र न्यायालयात फेरविचार अर्ज केला आहे. आम्ही काहीही निरीक्षण नोंदवणे हे आमच्या बाजूने योग्य होणार नाही, असे न्या. शिंदेंनी अगरवाल यांना सांगितले. मात्र, भादंवि कलम ४३९ अंतर्गत नियमित जामिनासाठी तुम्ही सत्र न्यायालयात अर्ज केला तर आम्ही त्या कोर्टाला २ दिवसांत म्हणजे मंगळवारपर्यंत निर्णय देण्याचे आदेश देऊ, असे चालू शकेल का? तुम्हाला मान्य आहे का?’ अशी विचारणा न्या. शिंदेंनी आरोपी सारडा, गोस्वामींच्या वकिलांना केली.    

 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयarnab goswamiअर्णब गोस्वामीPoliceपोलिसAnvay Naikअन्वय नाईकSessions Courtसत्र न्यायालय