शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

Army Soldier Killed: लष्कराच्या जवानाची भररस्त्यात गोळी झाडून हत्या; रेल्वे स्टेशनचा पत्ता विचारण्याचा केला बहाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 18:44 IST

जवान बबलू बाईकवरून जात होते, तेवढ्यात...

Army Soldier Killed: बिहारची राजधानी पाटणा येथे लष्कराच्या एका जवानाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जवान सुटीसाठी पाटण्याला पोहोचला होता. त्यावेळी पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली. बबलू कुमार असे या जवानाचे नाव आहे. कंकरबाग पोलीस ठाण्याच्या चिडियांतर पुलाजवळ डोक्यात गोळी झाडून जवानाची हत्या करण्यात आली. जवान बबलू यांचे वडील अमरनाथ यादव यांनी सांगितले की बबलू गुवाहाटी येथे सेवेत तैनात होते आणि आपल्या मुलाला सेंट्रल स्कूलमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी पाटणा येथे आले होते.

हत्या करण्यात आलेले जवान बबलू हे राजधानी एक्स्प्रेस पकडण्यासाठी पाटलीपुत्रहून गुवाहाटीला दुचाकीने जात होते. ते दुचाकीवर मागे बसले होते आणि त्यांचा मित्र बाईक चालवत होता. त्यावेळी मागून एक दुसरी दुचाकी आली. त्यांनी पाटणा स्टेशनचा रस्ता विचारण्यासाठी दुचाकीचा वेग कमी केला. त्या बाईकस्वारांनी दुचाकीवर बसलेल्या बबलूच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी लागताच बबलू गाडीवरून खाली पडला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.

लष्करी जवान बबलू यांचे पार्थिव दानापूर येथील लष्करी कार्यालयात आणण्यात आले. तेथे लष्करी अधिकारी व जवानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. घडलेल्या घटनेबाबत कंकरबाग पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणाले की, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची छाननी करून गुन्हेगारांना लवकरच पकडण्यात येईल.

या आधी पाटणा साहिबमध्ये एका विद्यार्थिनीवर सार्वजनिकरित्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. शाळेतून परतणाऱ्या नववीच्या मुलीवर गोळ्या झाडण्याचा प्रकार घडला होता. आता जवानावर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ही सामान्य गुन्हेगारी घटना नाही, गुन्हेगारांच्या मनातून कायद्याचा धाक नाहीसा झाला आहे, असे ते म्हणाले. नितीश जी, हे तुमच्या राज्यात काय चाललंय? बिहार जंगलराजकडे परतत असल्याचं यावरून दिसून येतंय, अशी टीकाही त्यांनी केली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSoldierसैनिकFiringगोळीबारBiharबिहार