अकोला जिल्ह्यातील पारस येथे सशस्त्र दरोडा; एक लाख २० हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 04:01 PM2018-07-29T16:01:50+5:302018-07-29T16:13:47+5:30

पारस (जि. अकोला): बाळापूर तालुक्यातील पारस येथील रेल्वे स्टेशन चौकात अत्यंत रहदारी असलेल्या मार्गावरील पे्रमलाल यादव यांच्या घरावर २९ जुलै रोजी पहाटे ३ वाजता अज्ञात इसमांनी दरोडा टाकून सोने, चांदी व रोकड असा १ लाख २० हजार रुपयाचा माल लंपास केला.

Armed robbery at Paras; one lakh 20 thousand rupees | अकोला जिल्ह्यातील पारस येथे सशस्त्र दरोडा; एक लाख २० हजारांचा ऐवज लंपास

अकोला जिल्ह्यातील पारस येथे सशस्त्र दरोडा; एक लाख २० हजारांचा ऐवज लंपास

Next
ठळक मुद्दे कपाटाची किल्ली देण्यास नकार देणाऱ्या कलावती प्रेमलाल यादव यांना दरोडेखोरांपैकी एकाने लोखंडी रॉड मारून जखमी केले.सोन्या-चांदीचे दागिणे व नगदी १२ हजार असा एकूण १ लाख २० हजार रुपयाचा माल लंपास केला.

पारस (जि. अकोला): बाळापूर तालुक्यातील पारस येथील रेल्वे स्टेशन चौकात अत्यंत रहदारी असलेल्या मार्गावरील पे्रमलाल यादव यांच्या घरावर २९ जुलै रोजी पहाटे ३ वाजता अज्ञात इसमांनी दरोडा टाकून सोने, चांदी व रोकड असा १ लाख २० हजार रुपयाचा माल लंपास केला. कपाटाची किल्ली देण्यास नकार देणाऱ्या कलावती प्रेमलाल यादव यांना दरोडेखोरांपैकी एकाने लोखंडी रॉड मारून जखमी केले.
चड्डी व हाफ बनियन घातलेल्या तीन दरोडेखोरांनी यादव यांच्या घरात प्रवेश करताच दुसºया मजल्यावर झोपलेल्या त्यांच्या विनोद नामक मुलाच्या खोलीस बाहेरून कडी लावून कोंडून घेतले. त्यानंतर यादव पती-पत्नीस धमकावून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिणे (चांदीचा कंबरपट्टा वजन १/२ किलो किंमत १५ हजार, एक चांदीची लच्छी वजन १/२ किलो १५ हजार, तीन सोन्याच्या अंगठ्या वजन २० ग्रॅम किंमत ४० हजार, एक १० ग्रॅम वजनाची गळ्यातील चैन किंमत २० हजार, मंगळसूत्र, डोरले व तीस मणी किंमत १२ हजार, ३ ग्रॅम वजनाचे २ झुमके किंमत ६ हजार) व नगदी १२ हजार असा एकूण १ लाख २० हजार रुपयाचा माल लंपास केला.
तत्पूर्वी दरोडेखोरांनी रात्री २ वाजता शिक्षक कॉलनीमध्ये रहिवासी सुरक्षा रक्षक बोरे यांच्या घराचे कुलप तोडले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पोलीस कॉन्स्टेबल जंगबहादूर यादव यांच्या घराकळे वळविला. घराचे लोखंडी फेन्सींग कापत असताना यादव यांच्या कुत्र्याने जोरजोरात भुंकायला सुरुवात केली असता यादव यांना जाग आली. याप्रसंगी संख्येने पाच असलेले दरोडेखोर पळून गेले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा स्टेशन चौकातील प्रेमलाल यादव यांच्या घराकडे वळवून त्यांच्याकडील १ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल जबरीने घेऊन जाण्यास यशस्वी ठरले. पीएसआय वाणी अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Armed robbery at Paras; one lakh 20 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.