शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नव वर्षाच्या पार्टीत धक्का लागल्यामुळे सशस्त्र हल्ला, दोघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 21:25 IST

नवे वर्ष साजरे करण्यासाठी आयोजित पार्टीत धक्का लागल्यामुळे युवकांच्या समूहाने आपल्याच साथीदारांवर शस्त्राने हल्ला करून त्यांना मारहाण केली. मंगळवारी रात्री वाठोडाच्या श्रावणनगरात घडलेल्या या घटनेमुळे तणाव निर्माण झाला.

ठळक मुद्देवाठोडा परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवे वर्ष साजरे करण्यासाठी आयोजित पार्टीत धक्का लागल्यामुळे युवकांच्या समूहाने आपल्याच साथीदारांवर शस्त्राने हल्ला करून त्यांना मारहाण केली. मंगळवारी रात्री वाठोडाच्या श्रावणनगरात घडलेल्या या घटनेमुळे तणाव निर्माण झाला.वाठोडा पोलिसांना सहा आरोपींना अटक केली आहे. आरोपीत संदीप ऊर्फ तुषार पारडकर, विशाल ऊर्फ फल्ली गुप्ता, मनीष लाखोडकर, आकाश रेवतकर, प्रकाश कोसरे, विक्की पाटील यांचा समावेश आहे. त्यांचा बादल नावाचा साथीदार फरार आहे. जखमीत सौरभ शेखर उरकुडे (१९), जावेद अली (३२) यांचा समावेश आहे. सौरभ, जावेद आणि आरोपी श्रावणनगरात राहतात. मंगळवारी रात्री नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आरोपी आणि वस्तीतील नागरिकांनी घासीदास मंदिराजवळ पार्टीचे आयोजन केले होते. तेथे गाणे लावून नाचत सर्वजन नव्या वर्षाचे स्वागत करीत होते. जावेद आणि सौरभही तेथे आले होते. दोघेजण आरोपी आणि इतर नागरिकांसोबत नाचत होते. आरोपी आणि त्यांचे साथीदार नशेत होते. त्यामुळे नाचताना नागरिकांना त्यांचा धक्का लागत होता. यावरून आरोपींशी जावेद आणि सौरभला वाद झाला. आरोपींनी त्यांना शिविगाळ केली. दोघांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. सौरभ आणि जावेदने शांत राहण्यास सांगितल्यामुळे आरोपी आणखीनच चिडले. त्यांना शस्त्र, दगड आणि काठीने सौरभ व जावेदवर हल्ला केला. दोघांनाही गंभीर जखमी केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पार्टीत खळबळ उडाली. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. वस्तीतील नागरिकांनी सौरभ आणि जावेदला रुग्णालयात पोहोचविले. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी खुनाचा प्रयत्न आणि दंगा घडविण्याचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. सौरभ आणि जावेदवर उपचार सुरु आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर