अरमान कोहली ड्रग्ज कनेक्शन; दोघा नायजेरियनसह चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 07:52 AM2021-09-01T07:52:15+5:302021-09-01T07:52:27+5:30

एनसीबीने अरमानला अटक करून दक्षिण अमेरिकेतून मागवलेल्या कोकेनच्या तस्करीचा तपास केला असताना दोन विदेशी नागरिकांसह चौघांना अटक करून ११८ ग्रॅम एमडी व १३ ग्रॅम कोकेन जप्त केले.

Arman Kohli Drugs Connection; Four arrested, including two Nigerians pdc | अरमान कोहली ड्रग्ज कनेक्शन; दोघा नायजेरियनसह चौघांना अटक

अरमान कोहली ड्रग्ज कनेक्शन; दोघा नायजेरियनसह चौघांना अटक

Next

मुंबई : अभिनेता अरमान कोहली याच्या ड्रग्ज कनेक्शन संबंधातून अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ नायजेरियन नागरिकांसह चौघा जणांना अटक केली आहे. 

एनसीबीने अरमानला अटक करून दक्षिण अमेरिकेतून मागवलेल्या कोकेनच्या तस्करीचा तपास केला असताना दोन विदेशी नागरिकांसह चौघांना अटक करून ११८ ग्रॅम एमडी व १३ ग्रॅम कोकेन जप्त केले. जुहू गल्ली येथून मोहम्मद एजाज सय्यद ऊर्फ चिया भाई याला पकडून एमडी जप्त केले. त्याचा साथीदार इम्रान अन्सारी तसेच नायजेरियन नागरिक उबा चिन्सो विझडोम, याला नालासोपारा येथून अटक केली तो एमडीचा मुख्य पुरवठा करणारा होता.

माहितीतून एनसीबीने नवचिसीओ इस्राल नवाचूवू ऊर्फ सॅमला मंगळवारी आरे कॉलनी येथून अटक केली. तो दक्षिण अमेरिकन कोकेनची आयात करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एनसीबीच्या पथकाने संडे ओकेकी ऊर्फ सनी या नायजेरियन नागरिकाला नालासोपारा येथून अटक केली. तो काही अभिनेत्याकडे बॉडीगार्ड व बाउन्सर म्हणून काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Arman Kohli Drugs Connection; Four arrested, including two Nigerians pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.