शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कुत्रा अंगावर सोडण्याचा वाद विकोपाला; भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 10:34 IST

याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध  मारामारी, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पुणे - कुत्रा अंगावर सोडतोस काय यावरुन ज्येष्ठ नागरिकाबरोबर झालेल्या वादात आरडाओरडा ऐकून दारु पिणार्‍या तरुणांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. त्यात त्यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे.  कोथरुडमधील सहजानंतद सोसायटीच्या रोडवर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध  मारामारी, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अमर सयाजी बनसोडे (वय २६), विनोद सुरेश गंदे (वय २६ दोघे रा. गणंजय सोसायटी, श्रावणधारा वसाहत, कोथरुड), तेजस कांबळे, मिथून हरगुडे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका महिलेने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे सासरे शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता कुत्र्याच्या घेऊन बाहेर फिरायला जात होते. त्यावेळी सहजानंद सोसायटीच्या बाहेर जवळच्या सोसायटीतील अमर बनसोडे, विनोद गंदे व त्यांचे दोन मित्र हे तेथे दारू पित थांबले होते. त्यांच्या अंगावर कुत्रा भुंकल्याने त्यांनी कुत्रा अंगावर सोडतो काय या कारणावरुन त्यांच्यात वादावादी झाली. त्यावेळी हे चौघे चारचाकी गाडीतून त्यांच्या मागोमाग आले. त्यांनी शिवीगाळ करुन त्यांना मारण्यासाठी काचेची बाटली व दगड फेकून मारला. त्यामुळे फिर्यादीचे सासरे हे घाबरुन जोरात आरडाओरडा करीत सोसायटीत पळाले. त्यांचा आवाज ऐकून राहुल कोल्हे, विलास कोल्हे हे त्यांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनाही या चौघांनी मारहाण केली. तेव्हा त्यांना सोडविण्यासाठी फिर्यादी तेथे आल्या. तेव्हा त्यांच्यातील एकाने फिर्यादी यांच्या दंडाला धरुन ढकलून दिले.

हा आरडाओरडा ऐकून माजी आमदार मेधा कुलकर्णी याही तेथे पोहचल्या. सोसायटीतील इतर लोक जमले. तेव्हा या चौघांनी सर्वांना धक्काबुक्की करीत हाताने मारहाण करुन तुमचा मुडदा पाडण्याची व बघून घेण्याची धमकी दिली. या फिर्यादीनुसार कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनमध्ये सरकारने दारुची दुकाने उघडली़ पण त्याचवेळी बार बंद असल्याने गाड्यांमध्ये बसून, रस्त्यावर दारु पिण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून छोट्या मोठ्या मारामारीच्या घटना वाढल्या आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

१३ तास, ८ हॉस्पिटल अन् आठ महिन्याची गरोदर महिला; निर्दयी यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचा बळी

हॉस्पिटलचं बिल न भरल्याने ६० वर्षीय वृद्धाला खाटेला बांधले; दोषींवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

सिंथिया डी रिचीसोबत पाक पंतप्रधान इम्रान खान यांना करायचा होता सेक्स; धक्कादायक खुलासा

...तर खुलासा लवकरच होईल; अभिनेता सोनू सूदवर शिवसेना नेते संजय राऊतांचा गंभीर आरोप

जाणून घ्या, एटीएम मशीनला हात न लावता अवघ्या २५ सेकंदात ग्राहकांना पैसे काढता येणार!

टॅग्स :BJPभाजपाPoliceपोलिस