शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

कारचा हॉर्न वाजविण्यावरून झालेला वाद पोहोचला शेगला; विटा, दगडाने ठेचून युवकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 17:42 IST

Murder Case : आधी हाणामारी आणि त्यानंतर विटा आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

राजधानी दिल्लीत कारचा हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा विटा आणि दगड मारल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आधी हाणामारी आणि त्यानंतर विटा आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.16 जुलै रोजी दुपारी 2:53 वाजता साकेत मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 2 जवळ एक तरुण पडून असून त्याच्या तोंडातून रक्त येत असल्याचा पोलिसांना फोन आला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी पीडितेला सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. 17 जुलै रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास पीडित रोहितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तपासादरम्यान, पीडित रोहितचा मित्र राहुल याने दिल्ली पोलिसांना सांगितले की, 16 जुलै रोजी रात्री 2.30 च्या सुमारास रोहित आणि इतर मित्र साकेत मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 2 जवळ कार पार्क करत होते. तेथे उपस्थित असलेल्या काही मुलांशी त्याचे भांडण झाले. मारामारीदरम्यान त्या मुलांनी रोहितवर विटा आणि दगडाने प्रहार केला. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळाच्या आजूबाजूच्या 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी प्रियांशू नावाच्या आरोपीला पकडले. चौकशीदरम्यान प्रियांशूने पोलिसांना सांगितले, घटनेच्या वेळी तो त्याच्या पाच मित्रांसह उभा होता, तेव्हा कारमध्ये 4 मुले आली आणि त्यांना ते उभे होते तिथे कार पार्क करायची होती. तो न हलल्याने रोहितने गाडीचा हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली, त्यावरून मारामारी सुरू झाली आणि त्यानंतर दोन मुलांनी रोहितच्या डोक्यावर दगड आणि विटांनी वार केले आणि ते फरार झाले. सध्या पोलीस उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिसcarकारParkingपार्किंग