शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 09:33 IST

Praveen Jadhav: ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजी स्पर्धेत निवड झालेल्या प्रवीण जाधव या खेळाडूने त्याच्या कुटुंबीयांना काहीजण त्रास देत असून,  त्यांनी धमकीही दिल्याचे सांगितल्याने शासकीय यंत्रणा या प्रकरणाचा मागोवा घेत आहेत.

फलटण (जि. सातारा) : ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजी स्पर्धेत निवड झालेल्या प्रवीण जाधव या खेळाडूने त्याच्या कुटुंबीयांना काहीजण त्रास देत असून, त्यांनी धमकीही दिल्याचे सांगितल्याने शासकीय यंत्रणा या प्रकरणाचा मागोवा घेत आहेत. या  तक्रारीची अद्याप पोलिसात नोंद झालेली नाही.हरियाणा येथे सराव करत असलेल्या प्रवीण जाधव याने तेथे पत्रकारांना सांगितले की, सरडे (ता. फलटण) गावातील एका कुटुंबातील पाच ते सहा लोक माझ्या घरी आले आणि त्यांनी माझे आई-वडील व काका-काकूंना धमकावण्यास सुरुवात केली. जाधव यांच्या कुटुंबातील चार सदस्य झोपडीत राहत होते. मात्र, प्रवीण सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांनी पक्के घर बांधले आहे.  माझ्या शेजाऱ्यांना घरासमोरून एक वेगळा रस्ता हवाय. त्यावर आम्ही त्यांना होकारही दिला होता. मात्र,  आता त्यांनी हद्द केलीय. त्यांनी  माझ्या कुटुंबीयांना धमकी  देण्यास सुरुवात केली आहे. आम्ही घराची दुरुस्ती करणार असल्याने त्यांनी आम्हाला विरोध दर्शविला आहे, असेही त्याने सांगितले आहे.या तक्रारीची अद्याप पोलिसात नोंद झाली नसली, तरी फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी सरडे येथे जाऊन या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कुटुंबीयांनी सातारा जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांच्याशीही चर्चा केल्याचे समजते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर