शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

इसिसच्या दहशतवाद्यांना रसद पुरवणारा अकीब नाचन ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 07:36 IST

राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवादविरोधी पथकाची भिवंडीत कारवाई 

लोकमत न्यूज नेटवर्कपडघा : देशाच्या स्वातंत्र्यदिनी मोठा घातपात घडवण्याचा कट रचणाऱ्या आयसीसच्या पुण्यातून अटक केलेल्या दहशतवाद्यांची सारी व्यवस्था पाहाणारा व रसद पुरविणारा अकीब नाचन याला राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि दहशतवादविरोधी पथक (एटीएस) यांनी ताब्यात घेतले. पडघ्यालगतच्या बोरिवली गावामधून शनिवारी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास केलेल्या कारवाईत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. 

या आयसीसच्या दहशतवाद्यांची निवास व्यवस्था करण्यापासून त्यांना या कटकारस्थानाकरता रसद पुरविल्याच्या संशयावरून अकीब नाचनवर ही कारवाई केली गेली आहे. सुमारे एक वर्षापूर्वी गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने अकीबला अटक करून त्याच्यावर मोक्काखाली कारवाई केली होती. या प्रकरणात जानेवारी २०२३ मध्ये त्याला जामीन मिळाल्याने तो पुन्हा बोरिवलीत परतला होता. काही दिवसांपासून एनआयए मॉड्युल महाराष्ट्रात सक्रिय आहे. या मॉड्युलचा भाग म्हणून पडघ्यात ही छापेमारी केली. यापूर्वी पाच जणांना एनआयएने अटक केली आहे. त्यात मुंबईतून एक, पडघ्यातून दोन, पुण्यातून दोन अशा पाच दहशतवाद्यांचा समावेश आहे. पडघ्यातून अटक केलेले झुल्फिकार अली बरोडावाला आणि जुबेर खान हे दोघे पडघ्यात भाड्याने राहत होते. या दोघांना अकीबने आर्थिक मदत केल्याचा एनआयएचा दावा आहे. 

अकीब नाचन कोण आहे?

अकीब नाचन हा पडघ्यातील बांधकाम व्यावसायिक असून येथे त्याचा प्रशस्त बंगला आहे. २३ मार्च २०११ रोजी अकीबवर बोरिवली गावात  किरकोळ मारहाण व धमकी देण्याचा पहिला गुन्हा दाखल झाला होता. २५ जून २०१५ रोजी न्यायालयाने यातून त्याची निर्दोष सुटका केली. 

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (मोक्का) कायद्यानुसार भिवंडीतील निजामपुरा पोलिस ठाण्याने २९ ऑगस्ट २०१२ रोजी अकीबला अटक केली होती. सध्या तो या प्रकरणी जामिनावर आहे. अकीबला दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणास्तव गुजरात एटीएसने १५ मे २०२२ रोजी त्याला अटक केली होती. इसिसच्या अल सुफा या संघटनेशी त्याचा संबंध होता. १० जानेवारी २०२३ रोजी त्याला या प्रकरणी जामीन मिळाला.

एनआयए आणि एटीएस यांनी पुण्याच्या कोंढवा भागातून शोधून काढून उद्ध्वस्त केलेली मॉड्युल्स एकमेकांच्या संपर्कात होती, हे आता स्पष्ट झाले आहे. एनआयएने अटक केलेला झुल्फिकार अली बरोडावाला हा एटीएसने अटक केलेल्या मोहम्मद युसुफ खान व मोहम्मद युनुस साकी या दोघांना पैसे पुरवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी साकिब नाचन ठरला होता वादग्रस्तसाकिब नाचन हा एकेकाळी सिमी संघटनेशी संबंधित असल्यावरून वादग्रस्त ठरला होता. आजही साकिबचे येथे वास्तव्य आहे. नाचन कुटुंबाचे येथे राजकीय वर्चस्व असून दहशत आहे. त्यामुळे बोरिवली गावातील काही नागरिकांशी संपर्क साधला असता कुणीही उघडपणे प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, सर्वसामान्य कुटुंबातील अकीबने बोरिवली गावात कोट्यवधी रुपये खर्च करून आलिशान बंगला कसा उभारला, याची चर्चा आहे. अकीबचे शिक्षण पुण्यात झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाISISइसिस