शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावमध्ये अ‍ॅपे-कंटेनरचा भीषण अपघात; ६ ठार, ७ जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 13:55 IST

अपघातानंतर कंटेनरचा चालक दर्शनसिंग  (वय ४२ रा दानामंडी लुधियाना पंजाब) हा नाशिकच्या दिशेने फरार झाला.  मात्र  स्थानिक नागरीकांच्या मदतीने पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील मुंबई - नागपूर महामार्गावर चांदेकसारे येथे शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अ‍ॅपे आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. कंटेनरने (- पी बी ०५ एबी ४००६) समोरून येणाऱ्या मोटारसायकलला कट मारून प्रवासी वाहतूक करणाऱ्या अ‍ॅपे रिक्षाला ( एम. एच.१७ ए. जे. ९०५६) जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षातील ६ जणांचा  जागीच मृत्यू झाला. तसेच रिक्षातील प्रवाशांसह संबंधित मोटारसायकलवरील तीन जण, असे एकूण ७ जण जखमी झाले आहेत. जखमीवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांची नावे अशी -  १) राजाबाई साहेबराव खरात  (वय ६० वर्षे रा. चांदेकसारे)२) आत्माराम जम्मानसा नाकोडे (वय  ६५ वर्षे रा. वावी,)३) पुजा नानासाहेब गायकवाड (वय २० वर्षे  रा. हिंगणवेढे)४) प्रगती मधुकर होन (वय २० वर्षे रा. चांदेकसारे) ५) शैला शिवाजी खरात (वय ४२ वर्षे रा.श्रीरामपूर)६) शिवाजी मारुती खरात (वय ५२ रा. श्रीरामपूर)

या अपघातात जखमी झालेल्यांमुध्ये विलास साहेबराव खरात (वय ३४ वर्षे रा. चांदेकसारे), कावेरी विलास खरात (वय ५ वर्षे  रा. चांदेकसारे), रुपाली सागर राठोड (वय ४० वर्षे  रा. सिन्नर), धृव सागर राठोड (वय १७  रा.  सिन्नर) यांचा समावेश आहे. तर मोटार सायकलवरील दिगंबर चौधरी व त्यांच्या बरोबर त्यांचा मुलगा सर्वेश दिगंबर चौधरी (वय १२ वर्षे), बहीण कृष्णाबाई गोविंद चौधरी (वय ४२ वर्षे ) सर्व राहणार पोहेगाव, हे किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर  एस.जे.एस. रुग्णालयात उपचार सुरु आहे.  अपघातानंतर कंटेनरचा चालक दर्शनसिंग  (वय ४२ रा दानामंडी लुधियाना पंजाब) हा नाशिकच्या दिशेने फरार झाला.  मात्र  स्थानिक नागरीकांच्या मदतीने पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यासाठी माजी उपसरपंच केशवराव होन, डाऊचचे सरपंच संजय गुरसळ, शंकर गुरसळ, सुधाकर होन, कांतीलाल सोळसे, सिद्धार्थ सोळसे, आदिसह स्थानिक नागरिकांनी विशेष प्रयत्न केले.

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव