शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री बलात्कार प्रकरण : अनुराग कश्यप यांची आठ तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 06:52 IST

मुंबई : चित्रपट निमार्ते अनुराग कश्यप गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास वर्सोवा पोलीस ठाण्यात हजर झाले. तब्बल आठ तासांच्या ...

मुंबई : चित्रपट निमार्ते अनुराग कश्यप गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास वर्सोवा पोलीस ठाण्यात हजर झाले. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर रात्री साडेसातला ते बाहेर पडले. घरी बोलावून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अभिनेत्री पायल घोषने त्यांच्यावर केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना समन्स बजावले होते.

अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दाखल तक्रारीनुसार, चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांना पोलिसांनी समन्स बजावले. त्यानुसार, त्यांना चौकशीसाठी गुरुवारी वर्सोवा पोलीस ठाण्यात हजर राहावे लागले. लैंगिक अत्याचाराचा प्रकार २०१३-१४ दरम्यान घडल्याचा अभिनेत्रीचा आरोप आहे. तिच्या तक्रारीनुसार, कश्यप यांच्यावर वर्सोवा पोलिसांनी २२ सप्टेंबर, २०२० रोजी दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

कश्यप यांना अटक करण्याची मागणी पीडित अभिनेत्रीच्या वतीने तिचे वकील अ‍ॅड. नितीन सातपुते यांनी केली. त्यासाठी उपोषणाचा इशाराही देण्यात आला. तसेच वाय सुरक्षा मिळावी यासाठी पीडितेने सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीदेखील भेट घेतली होती. त्यानंतर आता गुरुवारी म्हणजे १ आॅक्टोबर, २०२० रोजी कश्यप यांना या प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर रात्री साडेसातला ते बाहेर पडले. दरम्यान, पाली हिल परिसरात कथित घटनास्थळ असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल्याने तपास अधिकाऱ्यांसोबत अभिनेत्रीने त्या ठिकाणीही भेट दिली होती.आरोप फेटाळलेसध्या कश्यप यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कश्यप यांनी मात्र त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

टॅग्स :Anurag Kashyapअनुराग कश्यपCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार