शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत बोगस पोलिसांचा सुळसुळाट, दागिने चोरीची दुसरी घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 18:01 IST

Crime News: भिवंडीत बोगस पोलिसांकडून भर रस्त्यात दुचाकीवरून जाणाऱ्या वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडे गाडीचे कागदपत्र तपासणीच्या नावाने मागत पोलीस असल्याचे सांगून दागिने काढून ठेवण्याचा सल्ला देत दागिने चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे...

- नितिन पंडीत भिवंडी  - भिवंडीत बोगस पोलिसांकडून भर रस्त्यात दुचाकीवरून जाणाऱ्या वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडे गाडीचे कागदपत्र तपासणीच्या नावाने मागत पोलीस असल्याचे सांगून दागिने काढून ठेवण्याचा सल्ला देत दागिने चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून कोनगाव पोलीस ठाणे हद्दीत बनावट पोलीस बनून आलेल्या दोघा जणांनी मंदिरात जाऊन घरी परतणाऱ्या दोघा जणांना रस्त्यात थांबवून पोलीस असल्याचे खोटे ओळखपत्र दाखवून दागिने लुबाडण्याची घटना शुक्रवारी घडली आहे.

अनिलकुमार चंपकलाल मास्टर ( वय ५८ ) हे आपल्या पत्नीसह वडपा येथील खोडियार माता मंदीर येथे दर्शनासाठी जाऊन दुपारी अडीच वाजता आपल्या दुचाकी वरून घरी जात असताना सरवली फाटा, रिलायन्स पेट्रोलपंपा जवळ उभ्या असलेल्या दोघा व्यक्तींनी दुचाकी थांबविण्यास इशारा करीत एकाने आम्ही स्पेशलवाले पोलीस असल्याचे खोटे ओळखपत्र दाखवीत तुम्ही हेल्मेट घातलेले नाही.मास्क व्यवस्थित तोंडावर लावला नाही असे सांगत दुचाकी वरील पतीपत्नीस पुढे खुन झालेला आहे. तुमचे जवळील दागिने काढुन पिशवीत ठेवा असे बोलून सदर इसमांनी अनिलकुमार व त्यांच्या पत्नीला बोलण्यात गुंतवून हातचलाकी करून पत्नीच्या गळ्यातील सोन्याची चैन व दोन सोन्याच्या बांगडया लबाडीने घेवुन दोघा पति पत्नीची फसवणूक करून त्या ठिकाणाहून पसार झाले. या प्रकरणी अनिलकुमार यांनी कोनगाव पोलिस ठाणे गाठून आपली कैफियत सांगितली असता पोलिसांनी दोघा बनावट पोलीस बनून आलेल्या अज्ञातां विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

चार दिवसांपूर्वी नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानकोली नाका येथे दुचाकी वरून जाणाऱ्या एक वयोवृद्धास गाठत त्यास पोलीस असल्याचे भासवित त्याच्या जवळील ७५ हजार रुपय किमतीची सोन्याची चैन घेऊन बोगस पोलीस चोरटे फरार झाल्याची घटना घडली होती . चक्क पोलीस असल्याची बाटवामि करून नागरिकांची लूट होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने भिवंडी पोलिसांसमोर या बोगस पोलिसांच्या मुसक्या वळण्याचे मोठे आवाहन निर्माण झाले आहे . दरम्यान रस्त्यात अशा प्रकारे कोणी सांगून फसवीत असताना नागरीकांनी स्वतः सह आपल्या मौल्यवान दागिन्यांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी केले आहे.

टॅग्स :GoldसोनंCrime Newsगुन्हेगारी