शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

कुख्यात आंबेकर आणि भाच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 00:48 IST

इतवारीतील प्रतिष्ठित परिवारातील व्यावसायिकाला धमक्या देऊन २५ लाखांची खंडणी उकळणारा कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर आणि त्याचा भाचा शैलेष केदार या दोघांविरुद्ध पोलिसांनी पुन्हा एक गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देव्यावसायिकाला वेठीस धरले : २५ लाखांची खंडणी उकळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इतवारीतील प्रतिष्ठित परिवारातील व्यावसायिकाला धमक्या देऊन २५ लाखांची खंडणी उकळणारा कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर आणि त्याचा भाचा शैलेष केदार या दोघांविरुद्ध पोलिसांनी पुन्हा एक गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचा परिणाम म्हणून आंबेकर टोळीकडून वेठीस धरल्या गेलेले अनेक पीडित आता पुढे येत असून, हे प्रकरण त्यातीलच एक दुवा असल्याचे मानले जाते.लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे अविनाश जोहरापूरकर यांच्या तक्रारीवरून मंगळवारी लकडगंज ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. जोहरापूरकर यांनी काही वर्षांपूर्वी इतवारीतील दारोडकर चौकात आरणा कॉम्प्लेक्स उभारले. येथील व्यापारी गाळ्यांची विक्री करून देतो, असे सांगून माहिती मिळवणाऱ्या संतोष-शैलेष या मामा-भाच्याने जोहरापूरकर यांना नंतर धमकावणे सुरू केले. आम्हाला एक व्यापारी गाळा दे किंवा २५ लाख रुपये दे, असे म्हणून त्यांनी जोहरापूरकर यांच्या व्यवहारात ढवळाढवळ सुरू केली. येथे आमच्या परवानगीशिवाय कुणीही काही खरेदी करणार नाही, अशी कुख्यात आंबेकर आणि त्याच्या भाच्याने भूमिका घेतल्याने जोहरापूरकर कुटुंबीयांना प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास झाला. त्यांनी या गुंडाच्या जाचातून मोकळे होण्यासाठी त्याला २५ लाख रुपयांची खंडणी दिली. विशेष म्हणजे, कायद्याची चांगली जाण असूनही आंबेकरविरुद्ध प्रभावी कारवाई होत नसल्याचे माहीत असल्यामुळे जोहरापूरकर कुटुंबीयांनी त्याला खंडणी देणे पसंत केले. मात्र, ते शल्य त्यांना होतेच. आता पोलिसांनी कारवाईचा धडाका लावल्याने अखेर अविनाश जोहरापूरकर यांनी वरिष्ठांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर, लकडगंज ठाण्यात संतोष आंबेकर आणि शैलेष केदारविरुद्ध गुन्हा दाखल केला.मामा-भाचे अन् बाकीच्यांचे काय?तीन दशकांपासून गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या संतोष आंबेकर आणि टोळीने अनेकांचे जगणे मुश्किल करून सोडले आहे. अनेकांची मालमत्ता हडपून त्यांना आंबेकर टोळीने उद्ध्वस्त केले आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या करड्या भूमिकेमुळे आंबेकरविरुद्ध सोनेगाव, तहसील, लकडगंज ठाण्यात वेगवेगळे १० गुन्हे दाखल झाले आणि अजून काही गुन्हे दाखल होणार आहेत. मात्र, संतोषची पाठराखणकरणाऱ्यांनाही पोलिसांनी हुडकून त्यांना बेड्या ठोकाव्यात, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर