शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Anil Deshmukh, Sachin Vaze: अनिल देशमुख ईडीकडे, सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 06:51 IST

बांधकाम व्यावसायिकाकडून हप्तेवसुलीचे प्रकरण. गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांचे भागीदारीमध्ये बोहो रेस्टॉरंट बार आणि बीसीबी रेस्टॉरंट ॲण्ड बार आहे. सचिन वाझे हा अग्रवाल यांच्या कायम संपर्कात होता. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोरेगावमधील एका वसुलीप्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला सोमवारी ताब्यात घेतले. या प्रकरणात वाझेला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी परमबीर सिंह यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि रियाझ भाटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सध्या मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे.

प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करणे आणि व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (एनआयए) अटक केलेल्या वाझे याचा ताबा मिळवण्यासाठी विशेष एनआयए न्यायालयात अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने दिलेल्या परवानगीनंतर गुन्हे शाखेने सोमवारी सकाळी नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून वाझे याचा ताबा घेतला.

काय आहे प्रकरण?गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांचे भागीदारीमध्ये बोहो रेस्टॉरंट बार आणि बीसीबी रेस्टॉरंट ॲण्ड बार आहे. सचिन वाझे हा अग्रवाल यांच्या कायम संपर्कात होता. मुंबई पोलीस दलात नियुक्ती झाल्यानंतर वाझे याने अग्रवाल यांना वसुलीसाठी त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने साथीदारांच्या मदतीने जानेवारी २०२० ते मार्च २०२१ मध्ये अग्रवाल यांच्याकडून ९ लाख रुपये आणि २ लाख ९१ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल हप्ता म्हणून घेतले, असे अग्रवाल यांनी तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेAnil Deshmukhअनिल देशमुख